Anil-Gote-Arjun-Khotkar  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhule cash controversy: आमदारांना वाटण्यासाठी अधिकारी आणि कंत्राटदारांकडून पैसे जमा केल्याचा संशय?

Arjun khotkar; money Collected from contractors and Officers of Dhule to give to MLAs?-धुळे विश्रामगृहातील १.८४ कोटी रुपयाच्या तपासाला वेगळेच फाटे फुटण्याची भीती

Sampat Devgire

Anil Gote News: धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहाशी संबधीत विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते अर्जुन खोतकर प्रकरण अद्यापही गाजते आहे. आता या प्रकरणी तिसऱ्या शासकीय कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातून धक्कादायक खुलासा होण्याची दाट शक्यता आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या विश्रामगृहातील कक्षात बेहिशोबी घबाड सापडले होते. या संदर्भात पोलिसांनी तपासणी करून १.८४ कोटी रुपये ताब्यात घेतले होते. याविषयी गुन्हा दाखल करण्यात आला असून धुळे पोलीस तपास करीत आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी याबाबत स्टिंग ऑपरेशन करून राजकीय आणि आर्थिक घोटाळ्याचे कनेक्शन उघड केले होते. आता या प्रकरणी गौतम नारायण वाघमारे या तिसऱ्या संशयित आणि शासकीय कर्मचाऱ्याला पनवेल येथून ताब्यात घेण्यात आले आहे. वाघमारे हे मूळचे मुखेड जिल्हा नांदेड येथील आहेत.

श्री. वाघमारे यांची चौकशी करण्या साठी अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांनाही धुळे येथे आणण्यात आले आहे. विश्रामगृहावर सापडलेले पैसे कोणत्या कोणत्या मार्गाने आणि कोणत्या व्यक्तीकडून जमा करण्यात आले याचा तपास केला जाणार आहे. हा तपास अनेकांना अडचणीत आणू शकतो.

याबाबत विविध कयास बांधले जात आहे. खोलीत सापडलेले १.८४ कोटी रुपये विविध शासकीय अधिकारी आणि कंत्राटदारांकडून वर्गणी स्वरूपात जमा करण्यात आले असावे. हे पैसे विधिमंडळ अंदाज समितीचे सदस्य असलेल्या आमदारांना वाटण्यासाठी जमा केल्याचे बोलले जाते. त्याबाबत पोलिसांना पुरावे जमा करावे लागणार आहेत.

धुळे येथील रोकड प्रकरणाने विधिमंडळाच्या अंदाज समितीचे पितळ उघड पडले आहे. विधिमंडळाच्या विविध अंदाज समित्या राज्यभर दौरे करीत असतात. समित्यांची बडदास्त ठेवली जाते. सबंध शासकीय यंत्रणा त्यांच्या सेवेसाठी तत्पर असते. यामध्ये नेमके काय घडते हे धुळ्यातील प्रकरणाने उघड झाले आहे. त्यामुळे या समित्यांबाबत आता विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

धुळे येथे विश्रामगृहात पाच कोटी रुपये जमा झाले होते. त्यातील पैसे विविध लोकांना वाटण्यात येत होते. दिवसभर हा प्रकार सुरू होता. सायंकाळी आपण या कक्षाला कुलूप लावून पोलिसांना आणि विविध शासकीय यंत्रणांना माहिती दिली, असा दावा माजी आमदार गोटे यांचा होता.

धुळ्यातील कोट्यावधीच्या रोकड प्रकरणी थेट राजकीय नेत्यांचा संबंध आहे. स्वीय सहाय्यक किशोर पाटील याला त्यामुळेच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निलंबित केले आहे. या प्रकरणात थेट मुख्यमंत्री स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे धुळे प्रकरणातील रोकड आणि त्यातील राजकीय नेत्यांचा संबंध या तपासाला आता वेगळाच वास देखील येऊ लागला आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT