Suvendra Gandhi  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Leader Arrest Warrant: भाजपच्या बड्या पदाधिकाऱ्याविरोधात अटक वॉरंट जारी; सुनावणीला गैरहजर राहणे भोवले

BJP Nagar Political News: भाजपचे दिवंगत खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी हे सुनावणीसाठी गैरहजर होते.

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे

Nagar News : व्यावसायिक फर्मशी संबंधित आर्थिक व्यवहारावरून दाखल असलेल्या कंपनी प्राधिकरणापुढील सुनावणीस गैरहजर राहिल्याने भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे. (Arrest warrant issued against Suvendra Gandhi of BJP)

गणपती ट्रेडर्सच्या वतीने आर्थिक व्यवहारापोटी माजी केंद्रीय मंत्री दिवंगत दिलीप गांधी (Dilip Gandhi) कुटुंबीयांच्या मालकीच्या मनसुख मिल्क प्रोसेसिंग प्रा. लि. (ढवळगाव, ता. श्रीगोंदे) आणि गांधी फायकार्प या फर्म विरोधात प्राधिकरणाकडे दावा दाखल केला होता. प्राधिकरणाचे न्यायाधीश अन्शुल सिंघल यांच्या समोर वेळोवेळी सुनावणी झाली.

भाजपचे (BJP) दिवंगत खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी हे सुनावणीसाठी गैरहजर होते. फौजदारी न्याय प्रक्रिया संहितेच्या कलम ८२ मधील तरतुदीनुसार प्राधिकरणाने ता.१ ऑगस्ट २०२३ रोजी सुवेंद्र गांधी यांचा जामीन रद्द केला आहे. त्यांना अटक वॉरंट काढले आहे. तसेच, ते राहत असलेल्या पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना वॉरंटची कार्यवाही करण्याचा आदेश दिला आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनाही मागील आठवड्यात सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील कपाशी येथील शरयू ॲग्रो इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्याची जवळपास एक कोटी चौदा लाख रुपयांची फसवणूक प्रकरणात लोणंद पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता माजी नगरसेवक असलेले भाजप पदाधिकारी सुवेंद्र गांधी यांच्या विरोधात अटक वॉरंट निघाले आहे. एकूण या घडामोडींवर सध्या भाजपच्या स्थानिक वरिष्ठांनी चुप्पी साधल्याचे चित्र आहे.

सुनावणीस हजर राहणार...

प्राधिकरणासमोरील सुनावणीच्या वेळेस आपल्याला पोहोचण्यासाठी थोडा उशिर झाला. आपण ज्या वेळेस प्राधिकरणासमोर पोहोचलो. तोपर्यंत प्राधिकरणाची कार्यवाही पूर्ण झालेली होती. आपण वकिलांमार्फत म्हणणे सादर केलेले आहे. प्राधिकरणासमोरील सुनावणीस आपण उपस्थित राहणार आहोत, असे सुवेंद्र गांधी यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT