Babanrao Pachpute sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Babanrao Pachpute : आमदार पाचपुतेंसमोर त्यांच्या पुत्रांना कार्यकर्त्यांनी सुनावले, "जमिनीवर या..."

MLA Babanrao Pachpute Meeting With Workers : महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना लोकसभा निवडणुकीत श्रीगोंदा मतदारसंघातून मताधिक्य कमी झाल्याने भाजप आमदार बबनराव पाचपुते यांनी कार्यकर्त्यांची चिंतन बैठक घेतली. या बैठकीकडे विखे कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली.

Pradeep Pendhare

Ahmednagar Political News : भाजप आमदार बबनराव पाचपुते यांनी बोलवलेल्या चिंतन बैठकीकडे विखे कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली. लोकसभा निवडणुकीत श्रीगोंद्यातून महायुतीचे घटलेले मताधिक्य हा बैठकीचा विषय होता.

या बैठकीत कार्यकर्त्यांनी आमदार पाचपुते यांच्यासमोर त्यांचे पुत्र विक्रमसिंह आणि प्रतापसिंह पाचपुते यांचे कान टोचले. तुम्हा भावांचा संपर्क कमी पडत आहेत. लोकांचे फोन उचलत नाही. आगामी विजयासाठी तुम्हा भावांनी जमिनीवर राहून लढ्याचे नेतृत्व करावे, असे कार्यकर्त्यांनी सुनावले.

महायुती भाजपचे (BJP) उमेदवार सुजय विखे यांचा श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य घटले आहे. श्रीगोंदे तालुक्यात भाजपचा आमदार आहे. ज्येष्ठ नेते आमदार बबनराव पाचपुते येथून भाजपचे प्रतिनिधित्व करतात.

घटलेले मताधिक्य त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे, हे ओळखून त्यांनी तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी चिंतन बैठक बोलावली. या बैठकीकडे सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली. भाजपचे देखील मोजकेच कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते. आमदार पाचपुते यांनी सुरवातीपासूनच बैठकीत घटलेल्या मताधिक्यावर लक्ष केंद्रीत केले.

या बैठकीत कार्यकर्त्यांनी आमदार बबनराव पाचपुते यांचे पुत्र विक्रमसिंह आणि प्रतापसिंह पाचपुते भावंडांनी एकत्रित काम करावे. कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी मदत करावी. लोकांचे फोन येतात.

ते उचलून त्यांची कामे मार्गी लाववीत. जमिनीवर येऊन लढ्याला समोरे गेले पाहिजे. यासाठी भावंडांनी एकत्रित काम करण्याचा सल्ला दिला. कार्यकर्त्यांची ही टोचणी आगामी निवडणुकीत काय होईल, याची चाहूल सांगितली.

विक्रमसिंह पाचपुते यांनी हिरडगाव साखर कारखान्याच्या काही अडचणी होत्या. आता त्या अडचणी दूर झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीबाबत माझ्याविषयी काही चुकीच्या चर्चा घडवून आणण्यात आल्या. आगामी निवडणुकी जिंकण्यासाठी एकत्रित काम करण्यावर भर असल्याचे सांगितले.

आमदार बबनराव पाचपुते म्हणाले, "सुजय विखे यांनी खासदारकीच्या काळात विकास कामांवर चांगला भर दिला. तशी त्यांनी कामे केली. परंतु पवार आणि ठाकरे यांच्याविषयी राज्यात सहानुभूतीची लाट आहे. त्यातून त्यांना चांगले मताधिक्य मिळाले. राज्यात महाविकास आघाडीला चांगल्या जागा जिंकत्या आल्या".

परंतु महायुतीचे सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत नेण्यासाठी आता कमी वेळ आहे. ती कामे घेऊन पुन्हा कामाला लागा. सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवा. विधानसभेला यश आपलेच असेल, असा विश्वास आमदार पाचपुते यांनी कार्यकर्त्यांमध्ये भरला. माजी सभापती पुरूषोत्तम लगड, अरुण पाचपुते, गणपतराव काकडे,पोपटराव खेतमाळीस बैठकीला उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT