Sujay Vikhe Vs Nilesh Lanke : विखेंना मताधिक्य तरी, लंके वरचढ; ठाकरे गटाला बसलाय राजकीय धक्का, तो असा...

Vote of Sujay Vikhe And Nilesh Lanke in Ahmednagar city : सुजय विखे यांना नगर शहरातून मताधिक्य असले तरी, नीलेश लंके यांनी चांगली मते घेतली आहे. सुजय विखे यांना मिळवलेले मताधिक्य ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या बालेकिल्ल्यातून घेतल्याने पुढची राजकीय गणितं धक्कादायक असू शकतात.
Nilesh Lanke on Sujay Vikhe
Nilesh Lanke on Sujay VikheSarkarnama

Ahmednagar News : शिवेसना उद्धव ठाकरे यांच्या गटाचा बालेकिल्ला असलेल्या अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे खासदार नीलेश लंके यांच्या मताधिक्याला धक्का बसला आहे. लंके यांच्या मताधिक्यातील ही घट शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या भागातील आहे.

नीलेश लंके यांनी घेतलेली मतं नगर शहरातील सर्वच नेत्यांच्या आगामी राजकीय वाटचालीवर भारी ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यातच भाजपचे वाढलेले मताधिक्य शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभेतील गणित निश्चितपणे बिघडवणार, असे राजकीय विश्लेषणांचा अंदाज आहे.

भाजपचे सुजय विखे आणि राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) पक्षाचे नीलेश लंके यांच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात अटीतटीची लढाई झाली. यात नीलेश लंके विजयी झाले. आता कोणत्या भागातून किती मताधिक्य याचे आकडे समोर येऊ लागले आहेत. नगर शहर विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी भाजपला सुखवणारी तर, ठाकरे गटाला चिंता वाढवणारी ठरली आहे. ठाकरे गटाचे विद्यमान नगरसेवक असलेल्या भागातून भाजपचे सुजय विखे यांना मताधिक्य दिसते आहे. असे असले, तरी नीलेश लंके यांनी शहरातून चांगले मते खेचून आणली आहेत.

नगर शहराचा मध्यवर्ती भाग, माळीवाडा, केडगाव, सावेडी, बालिकाश्र रोड, सर्जेपुरा, भिंगार या भागातून भाजपचे (BJP) सुजय विखे यांना मताधिक्य आहे. यात तोफखाना, चितळे रोड संपूर्णपणे सुजय विखे यांच्या मागे उभा राहिला आहे. माळीवाडा परिसर हा शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा बालेकिल्ला, याठिकाणी देखील सुजय विखे यांना मताधिक्य आहे. येथून भाजपला वाढलेले मताधिक्य ठाकरे गटाच्या नगरसेवकांना वेगळाच संकेत असल्याचे दिसते. बालिकाश्रम रोडवर शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक, माजी उपमहापौर आहेत. तेथून देखील सुजय विखे यांना मताधिक्य आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nilesh Lanke on Sujay Vikhe
Sharad Pawar And Nilesh Lanke : शरद पवार जाम खूष; आमदार जगतापांना जमलं नाही ते, लंकेंनी करून दाखवलं...

नगर शहरातील मताधिक्यावर लंके यांनी अगोदरच अभ्यास केलेला दिसतो. त्यांनी नगर शहरातील मोजक्याच भागाला जास्त वेळ दिला. केडगावमध्ये सुजय विखे यांचे मताधिक्य घटवण्यात नीलेश लंके यांना यश आले. विखे आणि लंके यांची तेथील टक्कर चर्चेत आली आहे. विखे यांना तिथे 11 हजार 378 मते मिळाली तर, लंके यांनी तेथूनच आठ हजार पाच मते घेतली. लंके यांना केडगावातून मिळालेली ही मते फायद्याचीच ठरली आहेत. झेंडीगेट आणि रामवाडी परिसरातून लंके यांना मोठे मताधिक्य मिळाले आहे. लंके यांना तेथून 2 हजार 736 मतं मिळालीत तर, विखे यांना 1 हजार 341 मतं मिळाली आहेत. रामवाडीत लंके यांना 2 हजार 453 मतं मिळालीत तर, विखे यांना 1 हजार 375 मतं मिळाली आहे.

Nilesh Lanke on Sujay Vikhe
BJP Vs NCP : 'आता बस्स! पालख्या व्हायच्या नाहीत'; नगर विधानसभा भाजपच लढवणार, संग्राम जगतापांचे काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com