Nilesh Lanke Vs Bajrang Dal : 'हिरवा रंग उधळला, बजरंग दल संतापला'; खासदार लंकेंच्या मिरवणुकीत नेमकं काय झालं...

Nilesh Lanke's victory procession in Ahmednagar : नगर शहरातील मुस्लिम बहुल भागात, मुकुंदनगरमध्ये नीलेश लंके यांच्या विजयाची मिरवणूक काढण्यात आली. यात मिरवणुकीत नीलेश लंके स्वतः सहभागी झाले होते. मिरवणुकीत हिरवा रंग उधळला गेला. या हिरव्या रंगावरून आता वाद पेटला आहे.
Nilesh Lanke Vs Bajrang Dal
Nilesh Lanke Vs Bajrang Dalsarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : खासदार नीलेश लंके यांच्या विजयानिमित्ताने मुकुंदनगरमध्ये हिरवा रंग उधळून काढलेल्या मिरवणुकीवरून बजरंग दलाने संताप व्यक्त केला आहे. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.

देश आणि हिंदूच्या सुरक्षितेला खासदारांच्या माध्यमातून तडा जात असेल तर, वेळप्रसंगी खासदारांना शहरात फिरू देणार नाही, असा इशारा बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांनी नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके यांना दिला.

महायुती भाजपचे उमेदवार सुजय विखे यांचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे उमेदवार नीलेश लंके खासदार झाले. नीलेश लंके यांच्या विजयाचा जल्लोष महाविकास आघाडीकडून होत आहे. याशिवाय नगर शहरात काल शरद पवार यांच्या उपस्थित वर्धापनदिन देखील साजरा झाला.

नगर शहरातील मुस्लिम बहुल भागात, मुकुंदनगरमध्ये नीलेश लंके यांच्या विजयाची मिरवणूक काढण्यात आली. यात मिरवणुकीत नीलेश लंके स्वतः सहभागी झाले होते. मिरवणुकीत हिरवा रंग उधळला गेला. या हिरव्या रंगावरून आता वाद पेटला आहे. बजरंग दलाने थेट खासदार नीलेश लंके यांना इशारा दिला आहे.

Nilesh Lanke Vs Bajrang Dal
Nilesh Lanke : खासदार लंके यांचा विश्वास पाहा; 'नगर जिल्ह्यात पवारसाहेबांचे 12 आमदार असतील...'

बजरंग दलाचे संयोजक कुणाल भंडारी यांनी यावरून नीलेश लंके यांना आव्हान दिले आहे. 'मिरवणुकीत हिरवा रंग उधळून उन्माद दाखवला गेला आहे. देशातील या मानसिकतेला खतपाणी निवडून आलेले खासदार घालत आहेत. त्यांच्या जीवावर खासदार झाल्याचे त्यांना वाटत आहे. देशाच्या आणि हिंदूंच्या सुरक्षितेला यांच्या माध्यमातून तडा गेल्यास, यांचे फिरणे आम्ही बंद करू. तुम्हाला देखील आम्ही धडा शिकवू', असा इशारा कुणाल भंडारी यांनी दिला आहे.

नगर दक्षिण लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघाची निवडून अतिशय रंगतदार आणि अटीतटी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभा घेतली. काँग्रेस मुस्लिमांना आरक्षण देईल, अशी भीती त्यांनी या प्रचारसभेत व्यक्त केली. याशिवाय या निवडणुकीच्या रिंगणात 'एमआयएम' देखील उतरले होते. परंतु एेनवेळी 'एमआयएम'ने माघार घेतली. त्यामुळे राजकीय वाद पेटला होता. बजरंग दलाने 'एमआयएम'च्या उमेदवारीवर जोरदार टीका केली होती.

निवडणुकीपूर्वी नगर शहर आणि जिल्ह्यात अनेक भागात जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण होण्याचे प्रकार झाले. त्यामुळे या निवडणुकीत मुस्लिम समाज उघडपणे समोर येण्याऐवजी काहीअंशी भाजपच्या विरोधात होता. निवडणुकीत खासदार नीलेश लंके यांच्या विजय झाल्याने मुस्लिम बहुल भागातील मुकुंदनगरमध्ये त्यांच्या विजयाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत हिरवा रंग उधळला गेल्यावरून बजरंग दलाने संताप व्यक्त करत थेट खासदार लंकेंना इशारा दिला आहे. खासदार लंकेंकडून आणि मुस्लिम समाजाकडून बजरंग दलाला या इशाऱ्यावर कशापद्धतीने उत्तर दिले जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Nilesh Lanke Vs Bajrang Dal
Shivaji Kardile Vs Shashikant Gade : विखेसाहेब कर्डिलेंबाबतचे 'ते' भाकीत आठवले का? 'शिवसेने'च्या गाडेंनी डिवचलं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com