Ashok Kharat ED investigation : अंध भक्तांची लूट करून त्यांच्या आर्थिक फायदा करून घेणाऱ्या विकृत भोंदू अशोक खरात याच्याभोवती ईडीने तपासाचा फास घट्ट करायला सुरवात केली आहे. ईडीने केलेल्या प्राथमिक तपासात अशोक खरात याच्या नियंत्रणात असलेल्या बँक खात्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जवळपास 60 बँक खात्यांमध्ये कोट्यवधी रूपये जमा करण्यात आल्याचे ईडीच्या तपासात समोर आलं आहे. ईडीने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून आर्थिक गैरव्यवहारांचा तपास सुरू केला.
अशोक खरात (Ashok Kharat) याने लोकांच्या धार्मिक आणि अध्यात्मिक वृत्तीचा गैरफायदा घेत, त्यांचं आर्थिक फसवणूक करताना माहिलाचं लैंगिक शोषण देखील केलं. अशोक खरात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने तपास सुरू केला आहे. नाशिकमधील जगदंबा आणि शिर्डीमधील समता नागरी पतसंस्थेच्या शाखेत अशोक खरात वारसदार असलेली शेकडो बँक खाते आढळली आहेत.
अशोक खरात हा भक्तांच्या नावाने बँक खाते सुरू करत असला, तरी त्याला वारसदार म्हणून त्याचे नाव आणि मोबाईल क्रमांक द्यायचा. अशी शेकडो खाते समोर आली आहेत. महिला (Women) आयोगाच्या माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय यांचे देखील खाते आढळली आहेत.
यातील समता पतसंस्थेतील दोन बचत खात्यांमध्ये 50 लाख रुपये रोखीने जमा करण्यात आले. पुढे ही रक्कम मुदत ठेव खात्यात वळती केली गेली. पुन्हा ती बचत खात्यात वळविण्यात आली आणि अखेरीस त्यातील जमा रोखीने काढण्यात आली. याच संशयास्पद व्यवहारांबाबत ईडीने प्रतिभा यांच्याकडे कसून चौकशी केली.
प्रतिभा यांनी आपल्या जबाबात हे सर्व व्यवहार आपल्या अपरोक्ष झाले आहेत. ही खाती आपल्या नावे असली तरी गैरव्यवहाराशी आपला संबंध नसल्याचे सांगितल्याचे समजते. प्रतिभा यांच्या मुलाकडे अद्याप चौकशी झालेली नाही.
ईडी सूत्रांनुसार, भोंदू अशोक खरातच्या नियंत्रणात असलेल्या सुमारे 60 बँक खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये जमा करण्यात आल्याचे तपासात उघड झाले. खातेदाराचे नाव वेगळे असले, तरी वारसदार म्हणून स्वतःचे नाव आणि मोबाईल क्रमांक जोडायचा. त्याद्वारे तो ही सर्व खाती स्वतःच्या नियंत्रणात ठेवत होता.
अटकेत असलेला खरातचा साथीदार ए. पी. बाकवे याच्याकडे ईडीने चौकशी केली. प्रत्येक बँक खात्यात रोखीने पैसे जमा करताना खातेदारासोबत बाकवे जातीने हजर असायचा. तसे ईडीच्या तपासात समोर आलं आहे. सर्व व्यवहार खरातच्या सूचनेवरून झाल्याचे त्याने तपासात सांगितले आहे.
दरम्यान, अशोक खरात याला शिर्डीच्या गुन्ह्यात वर्ग केलं असून, शेतकरी रावसाहेब गोंदकर यांची शेत जमीन व्यवहारात केलेली फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारकीच्या गुन्ह्यात त्याला चार दिवस पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. शिर्डीत त्याची पत्नी कल्पना खरातसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. समता नागरी पतसंस्थेत बनावट खाती उघडली म्हणून आणखी दुसरा गुन्हा दाखल आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.