Sushma Andhare Questions Arrest : अशोक खरातसोबत शेकडो कॉल्स-मेसेजेस; चाकणकर भगिनींना ‘सुरक्षा कवच’ कोणाचं? सुषमा अंधारेंनी पेटवली चर्चा

Sushma Andhare arrest news update: शिवसेना ठाकरे सेनेच्या सुषमा अंधारे यांनी नाशिकमधील भोंदू अशोक खरात याच्याशी असलेल्या व्यवहारावरून चाकणकर भगिनींवर पुन्हा निशाणा साधला आहे.
Sushma Andhare Ashok Kharat call details
Sushma Andhare Ashok Kharat call detailsSarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat Nashik Case: राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची ईडीने नाशिक अशोक खरात याच्याशी व्यवहारीक संबंधांवरून जवळपास आठ तास चौकशी केली. या चौकशीत धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे.

यात 2025 ते 2026 या कालावधीत प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरातमध्ये 230 कॉल्स आणि 200 पेक्षा अधिक संदेशांची देवाणघेवाण झाली आहे. या चौकशीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकर भगिनींवर जोरदार निशाणा साधला आहे.

सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करताना, चाकणकर भगिनी खोट बोलण्यातील निगरगट्टापणा, चाकणकरांचे सुरक्षा कवचावर भाष्य करण्याबरोबरच पोलिस चाकणकरांना अटक करायला घाबरतात का? असा सवाल केला. अंधारे यांच्या या टिप्पणीमुळे चाकणकरांना मिळत असलेल्या सुरक्षा कवचाविषयी चर्चांना तोंड फुटलं आहे.

समता नागरी पतसंस्थेत भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याची वारसदार असलेली शेकडो खाती शिर्डी पोलिसांना आढळली. या गुन्ह्यात अशोक खरात याला शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, या बँक खांत्यामध्ये रूपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा यांची चार खाती आढळली आहेत.

Sushma Andhare Ashok Kharat call details
Ashok Kharat And Pratibha Chakankar accounts : कोट्यवधींची उलाढाल की बनावट खाती? प्रतिभा चाकणकर खाते प्रकरणात हवाल्याचा संशय, राजकारण तापणार

या बँक खात्यांवर सुमारे 2 कोटी 70 लाख रुपयांचा व्यवहार झाला आहे. या प्रकरणात शिर्डी पोलिसांनी बजावलेल्या नोटीस प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा हजर होत, चौकशीला समोरे गेले होते. आता याच व्यवहारात ईडीने प्रतिभा चाकणकर यांची काल आठ तास चौकशी केली.

Sushma Andhare Ashok Kharat call details
Ashok Kharat Shirdi case : अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात; शेतकरी फसवणूक ते ‘समता’तून फिरलेल्या काळ्या पैशाचं रहस्य उलगडणार?

प्रतिभा चाकणकरांचा खरातविरोधात आरोप

या चौकशीत प्रतिभा चाकणकर यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. स्वतःचे आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर याचे आधार आणि पॅन कार्डचे तपशील अशोक खरात याला दिले होते. हे तपशील केवळ धार्मिक कामासाठी वापरले जातील, असे आश्वासन खरात याने दिले होते. मात्र, खरात याने, या विश्वासाचा गैरफायदा घेत, कागदपत्रांचा गैरवापर केला. बोगस बँक खाती उघडली, असा आरोप प्रतिभा चाकणकर यांनी केली.

अंधारेंचे चाकणकर भगिनींवर हल्लाबोल

प्रतिभा चाकणकर यांनी अशोक खरातवरच आरोप केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करत, चाकणकर भगिनींच्या खोटेपणाच्या निगरगट्टावर हल्लाबोल केला आहे.

पॅन कार्डबाबत मोठा खुलासा

सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, सर्वसाधारणपणे पॅन कार्ड हे आर्थिक व्यवहारांसाठी वापरले जाते. तिरुपती किंवा शिर्डीसारख्या ठिकाणी भक्तधाम निवासी खोल्या घ्यायच्या असतील किंवा काही पूजा अभिषेक करायचे असतील, तर त्यासाठी फार फार आधार कार्ड द्यावे लागते, याकडे लक्ष वेधले.

चाकणकर भगिनींच्या निगरगट्टापणावर वार

प्रतिभा चाकणकर ईडीच्या चौकशीत सांगतात की, पॅन कार्ड हे आम्ही धार्मिक कार्यासाठी दिले होते आणि त्याचा चुकीचा वापर झाला. चाकणकर भगिनी खोटं बोलण्यासाठीचा एवढा निगरगट्टापणा आणतात तरी कुठून? असा सवाल सुषमा अंधारेंनी केला आहे.

सुषमा अंधारेंचा सवाल

विशेष या सगळ्या प्रकरणांमध्ये अजूनही रूपाली चाकणकर एका सुरक्षित कवचामध्ये आहे. ही नेमकी कुणाची कृपा म्हणावी? असा सवाल करताना, अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीची पाळमुळं खणून काढायची असतील, तर नुसत्याच या भोंदूला पकडले आणि त्या भोंदूला पकडले, असा बातम्यांचा रतीब लावण्यापेक्षा भोंदूगिरीचे प्रस्थ वाढवणाऱ्या चाकणकरसारख्या धनिकांना थेट चाप लावणे गरजेचे आहे. मात्र पोलिस चाकणकरांना अटक करायला घाबरतात का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com