Ashok Kharat case MLA controversy details Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat Case : खरातच्या आहारी गेलेल्या आमदाराला बायकोने दरबारात जाऊन भरला होता दम, 'त्या' माजी मंत्र्याचीच पडली विकेट?

MLA scolded by wife over Ashok Kharat controversy: विविध भागातील आणि पक्षातील ३८ आमदार खरात याच्या संपर्कात आले होते. यातील अनेकांनी त्याच्याकडे काळ्या जादूचे प्रयोग केले. आता हे आमदार कोण याची चर्चा सुरू आहे. यामधून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एक आमदार अशोक खरातच्या मोहिनीला बळी पडला होता. तो जवळपास त्याच्या कच्छपी लागला होता.

Sampat Devgire

Nashik News, 26 Mar: भोंदू तांत्रिक अशोक खरात याची अनेक वादग्रस्त प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. यात सर्वाधिक धक्कादायक म्हणजे एका आमदाराने त्याला वाचवले होते. कॅप्टन खरात वाचला मात्र मंत्री झाल्यावर या माजी मंत्र्याचीच अल्पावधीत विकेट पडली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कॅप्टन खरात प्रकरणावर गंभीर आरोप केले. विधानसभेत झालेल्या चर्चे दरम्यान त्यांनी धक्कादायक दावा केला. यात नाशिकमध्ये घडलेल्या काही घटनांचाही उल्लेख झाला.

विविध भागातील आणि पक्षातील ३८ आमदार खरात याच्या संपर्कात आले होते. यातील अनेकांनी त्याच्याकडे काळ्या जादूचे प्रयोग केले. आता हे आमदार कोण याची चर्चा सुरू आहे. यामधून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एक आमदार अशोक खरातच्या मोहिनीला बळी पडला होता. तो जवळपास त्याच्या कच्छपी लागला होता.

तो खरातच्या जाळ्यात अडकला. त्याचा परिणाम म्हणजे राजकीय आणि सामाजिक कार्याकडे त्याचे दुर्लक्ष झाले होते. त्याची चर्चा झाल्यावर संबंधित आमदाराच्या पत्नीने खरातच्या दरबारात जाऊन त्याला दम भरला होता. आमदाराच्या पत्नीच्या या कणखर आणि आक्रमक अवतारामुळे खरात गर्भगळीत झाल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.

त्यानंतर हा आमदार घरात बसून अंतर ठेवून राहिला. पुढे त्याला नेत्यांच्या कृपेने मंत्रीपद मिळाले. मात्र कायदेशीर अडचणी आणि वादग्रस्त वक्तव्याने सगळ्यात आधी त्याचीच विकेट पडली. माजी मंत्री आव्हाड या विषयावर अत्यंत आक्रमक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या महाराष्ट्रात तांत्रिक आणि काळी जादू करणाऱ्याला मान्यता कशी मिळते? या प्रकरणाचा सरकारने खोलात जाऊन तपास करावा.

या दरम्यान माजी मंत्री आव्हाड यांनी एका मंत्र्यावरही अंगुली निर्देश केला आहे. मिरगाव येथील कमान, पाण्याची टाकी आणि रस्त्यासाठी सरकारी निधी कसा मिळतो? यावर त्यांनी गंभीर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणातील राजकीय नेत्यांची पुन्हा एकदा जोमाने चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT