Pune Traffic Update : राम नवमी उत्सवा निमित्त आज पुणे शहरातील वाहतूकीमध्ये बदल करण्यात आला आहे. शहरात निघणाऱ्या शोभायात्रांमुळे काही रस्ते बंद राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहेत. हे वाहतूक व्यवस्थेती बदल हे दुपारी चार ते रात्री 10 च्या दरम्यान असणार आहेत.
पुणे शहरातील मुख्य रस्ते बाजीराव रोड आणि लष्कर परिसरातील रस्ता दुपारी चार ते रात्री 10 या वेळेत वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. दरम्यान, या रस्त्यावर बंद वाहतुकीमुळे पर्याय रस्त्याची व्यवस्था करण्यात आला आहे.
बाजीराव रोड परिसर पुरम चौकातून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद आहे. या मार्गावरील वाहतूक टिळक रोड–अलका टॉकीज चौक – खंडोजी बाबा चौक मार्गे वाहतूक वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
लष्कर परिसरातील वाय जंक्शन येथे वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.एम.जी.रोडवरील वाहतूक 15 ऑगस्ट चौकातून उजवी/डावी वळविण्यात येईल.महंमद रफी चौकानंतरची वाहतूक ईस्ट स्ट्रीटमार्गे वळविण्यात येईल.कोहिनूर हॉटेल परिसरातून जाणारी वाहतूक भोपळे चौक व इतर पर्यायी मार्गांनी वळविण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.