Nashik Politics : नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून आता अनेक राजकीय नेते हे या प्रकरणात अडचणीत येत असल्याचे दिसत आहे. खरातसोबतच्या कथित संबंधामुळे राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांच्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षपदापाठोपाठ आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागला आहे. त्यानंतर आता या प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यावर राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी गंभीर आरोप केला आहे.
माणिकराव कोकाटे यांना मंत्री करू नये म्हणून भोंदू अशोक खरातने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना फोन केला होता असा दावा विकास लवांडे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. या प्रकरणी त्यांनी माणिकराव कोकाटे यांना त्यांच्याकडे असलेली माहिती पुढे आणावी असे आवाहन केले आहे.
रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तसेच राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा दिला आहे. परंतु त्यांनी फक्त राजीनामा देऊन काही होणार नाही. खरात प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनील तटकरेंसह रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करावे तसेच त्यांचे सर्व व्यवहार तपासले पाहिजेत. कारण अशोक खरात एकटा नसून, त्याची एक मोठी टीम आहे, असा दावा विकास लवांडे यांनी केला आहे.
अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील आहे. पण त्याला स्थानिक आमदार माणिकराव कोकाटे हे विरोध करायचे असा दावाही लंवाडे यांनी केला आहे. खरात सोबत कोकाटे यांचा एकही फोटो किंवा व्हिडिओ समोर आलेला नाही. कोकाटे हे खरातच्या मार्गात अडथळा ठरत होते. त्यामुळे याच खरातने राज्यात सत्ता स्थापनेवेळी सुनिल तटकरेंना फोन करुन कोकाटेंना मंत्री करु नये म्हणून फोन केला होता.
माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद दिले जाऊ नये म्हणून अशोक खरातने सुनील तटकरे यांना आग्रह धरला होता, तो त्यासाठी तटकरेंना फोन करायचा की नाही? याचा खुलासा सुनील तटकरे यांनी केला पाहिजे आणि माणिकराव कोकाटे यांनीही याबाबत बोलले पाहिजे, असे आवाहन विकास लवांडे यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.