Ashok Kharat : महिलांच्या केसांच्या बटा, 'ती' तांब्याची बाटली... खरातच्या कार्यालयात तपास पथकाला काय-काय सापडलं?

Ashok Kharat case : वासनांध भोंदूबाबा अशोक खरात याने आपल्या नाशिकमधील ज्या कार्यालयात महिलांचे लैगिंक शोषण केले त्या कार्यालयाची तपास पथकाने झाडाझडती घेतली. त्यानंतर कार्यालय सील करण्यात आलं.
Ashok Kharat
Ashok Kharat Nashik Office RaidSarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat case evidence : भोंदू बाबा अशोक खरात याने नाशिकमधील आपल्या ज्या कार्यालयात शेकडो महिलांचे लैगिंक शोषण केले त्या कॅनडा कॉर्नर परिसरातील 'ओकस प्रॉपर्टी डीलर्स ॲन्ड डेव्हल्पर्स' या कार्यालयात गुरुवारी एसआयटी व फॉरेन्सिक पथकाने झाडाझडती घेतली.

जवळपास एक तास चाललेल्या या तपासात कार्यालयातील विविध ठिकाणांची तपासणी करण्यात आली. कार्यालयातील कपाट, टेबल, संगणक तसेच इतर साहित्यावरील ठसे गोळा करण्यात आले. फिंगरप्रिंट्सह इलेक्ट्रॉनिक डेटा, कागदपत्रे तसेच इतर भौतिक पुरावे गोळा करण्यात आले.

वासनांध खरातने नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथे ओकस प्रॉपर्टी डीलर्स ॲन्ड डेव्हलपर्स या नावाने कार्यालय सुरु केलं होतं. प्रत्यक्षात या कार्यालयात तो अंकज्योतिषाच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करीत असल्याचे समोर आले आहे. फॉरेन्सिक व एसआयटी पथकाने संयुक्तरीत्या केलेल्या तपासात व पंचनाम्यात अनेक गोष्टी मिळाल्या.

Ashok Kharat
Ashok Kharat : तर तुमचे नामोनिशान नष्ट करू.. भोंदू खरातच्या माणसांनी अंनिस कार्यकर्त्यांना दिल्या होत्या धमक्या

पंचनाम्यात महिलांच्या केसांच्या बटा, तसेच खरात ज्या तांब्याच्या बाटलीतून पीडितांना पाणी पिण्यासाठी देत होता ती संशयित बाटली, तंत्र-मंत्रांसाठीचे गंडेदोरे, पूजाविधीसाठीचे साहित्य, आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे, डिजीटल पुरावे तपास यंत्रणेच्या हाती लागले आहेत. जप्त सर्व साहित्य पुढील तपासासाठी नाशिक व पुणे येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळांकडे पाठवण्यात आले आहे.

Ashok Kharat
Ashok Kharat Case: सरकारी अधिकाऱ्यांच्या पत्नीदेखील खरातच्या जाळ्यात; 10 तास चौकशी, म्हणाला, '...केलेली कृती हा विधीचाच एक भाग'

खरात याने पूजाविधीच्या नावाखाली अनेक हायप्रोफाईल लोकांकडून कोट्यावधी रुपये उकळल्याचे समोर आले असून गुन्हे दाखल आहेत. त्याअनुषंगाने खरातच्या आर्थिक व्यवहारांसंबधीची काही कागदपत्रेही पथकाच्या हाती लागली आहेत. या साऱ्या साहित्याचा रीतसर पंचनामा करण्यात आला आहे. पंचनामा करुन झाल्यानंतर एसआयटीने खरातचे ओकस कार्यालय सील केले आहे. तसेच एसआयटीच्या पथकाकडून खरातच्या आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी केली जात आहे. यासाठी खरातची व्यक्तिगत बँक खाती गोठविण्यात आली आहे. तसेच्या त्याच्या त्याच्या मिरगावच्या शिवनिका संस्थानचे बॅंक खाते देखील गोठावण्यात आले आहे.

Ashok Kharat
Ashok Kharat Wealth: अशोक खरात याची कुठे, किती आहे संपत्ती? यादी वाचा

तसेच भोंदू खरात मिरगाव येथे त्याने उभारलेल्या ईशानेश्वर मंदिरात बनावट साप दाखवून हा खरा साप असल्याचे सांगून त्याच्याकडे येणाऱ्या भाविकांमध्ये मी चमत्कार करु शकतो, अशी बतावणी करीत असे. तपास पथकाने हा २० फुटी बनावट साप तसेच एक रिमोट, त्यासाठीची वायरिंग जप्त केली आहे. हा साप प्लास्टिकपासून बनवलेला होता. हा साप रेंगाळणारी हालचाल करीत असे. तो इन्फ्रारेड रिमोटने पुढे, मागे, डावीकडे आणि उजवीकडे नियंत्रित केला जात असे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com