Ashok Kharat case : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी माध्यमांशी बोलताना भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर भाष्य केलं. महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा लावणारं हे प्रकरण आहे. याप्रकरणाचा एसआयटी सखोल तपास करत असून यातून कुणीही सुटणार नाही. तसेच ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी एसआयटीला पुरावे द्यावेत असं आवाहन बावनकुळे यांनी केलं.
दरम्यान, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन भोंदूबाबा अशोक खरातने अनेक शेतकऱ्यांना त्रास दिला. शेतकऱ्यांचे रस्ते आडवले. त्यांच्या जमिनी बळकावल्या. अशा अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार असे माध्यम प्रतिनिधींनी विचारले असता बावनकुळे म्हणाले, अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची केवळ बदली नाही तर डायरेक्ट बडतर्फ करणार, मग ते कोणत्याही खात्यातील असो असा इशारा मंत्री बावनकुळे यांनी दिला.
बावनकुळे पुढे म्हणाले, आमच्या अधिकाऱ्यांनी जर खरातला कोणत्याही प्रकारची मदत केली असेल. त्याच्या गैरकृत्यात कुणी सहभागी असेल त्यांच्यावर नक्की कारवाई होईल. अशोक खरातला जमिनी मालमत्ता जमा करण्यासाठी मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तसेच अशोक खरातच्या कार्यकक्षेतील सीसीटीव्ही तपासणार आहोत, त्यात जे दिसून येतील त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल. एसआयटी टीमकडून आमच्याकडे नावे आल्यावर त्यांची केवळ बदली नाही तर नोकरीवरच ठेवणार नाही, बडतर्फ करु असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
दरम्यान, अंजली दमानियांकडे सीडीआर कुठून आले याबाबत खासदार संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नावरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, दमानिया यांची माहिती काढण्याची वेगळी सिस्टिम आहे. मुख्यमंत्री कार्यालय अशी माहिती देणार नाही. मुख्यमंत्री कार्यालय अशा संवेदनशील प्रकरणात अशी माहिती देणार नाही. अंजली दमानिया यांच्याकडे जी माहिती आहे, त्यांनी ती एसआयटीकडे द्यावी असं बावनकुळे म्हणाले.
तसेच शिर्डी मधील काही शेतकऱ्यांची जमीन सावकारीच्या माध्यमातून बळकावण्यात आल्याच्या प्रकरणात जर त्यांनी माझ्याकडे सुनावणी लावली. एखादा अर्ज केला. तर मी माझ्या कोर्टात अर्ज दाखल करुन घेईल व पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्याची जबाबदारी महसूल मंत्री म्हणून मी घेईल असे बावनकुळे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.