Ashok Kharat : अशोक खरातचे कोठडीत बेकार हाल ; तब्येत खंगली, तब्बल सात किलो वजन घटले...

Ashok Kharat Health Update : ऐकेकाळी ऐषारामी जीवन जगणाऱ्या भोंदू अशोक खरातचे पोलिस कोठडीत मोक्कार हाल होत आहेत. त्याच्या तब्येतीवर परिणाम होत असून त्याचे वजनही घटले आहे.
Ashok Kharat Health Update, Custody Condition
Ashok Kharat Health Update, Custody ConditionSarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat Custody Condition : शेकडो लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली अशोक खरातला १८ मार्च रोजी नाशिक पोलिसांनी अटक केली होती. त्याला अटक करून आता जवळपास १७ दिवस झाले असून तो सध्या पोलिस कोठडीत आहे. मात्र, खरातचे कोठडीत बेकार हाल होत आहे. एकेकाळी ऐषारामी जीवन जगणाऱ्या खरातचे कोठडीत वजन घटले असून, असून त्याची प्रकृती खंगली आहे.

खरातवर आतापर्यंत एकुण बारा गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील ८ गुन्हे महिला लैंगिंक शोषणाचे व ४ गुन्हे फसवणुकीचे आहेत. खरातच्या वकिलांनी जामीन मिळवण्यासाठी बराच आटापिटा केला पण खरात रोज नवनवीन गुन्ह्यांमध्ये आडकत असल्याने त्याची पोलिस कोठडी वाढत आहे. पोलिस सातत्याने न्यायालयाकडे चौकशीसाठी त्याची पोलिस कोठडी मागत आहेत.

दरम्यान पोलिस कोठडीत असलेल्या खरातची एसआयटीकडून कसून चौकशी सुरु आहे. त्याच्या मुलाची देखील पोलिसांनी चौकशी केली आहे. त्याची बायको मात्र फरार आहे. पोलिस त्याची बायको कल्पना खरातचा शोध घेत असून तीच्याविरोधात लूक आउट नोटीस जारी करण्यात आली आहे.

Ashok Kharat Health Update, Custody Condition
Ashok Kharat News: मुलाच्या एका उत्तराने अशोक खरातचा पाय आणखी खोलात; SIT चौकशीत धक्कादायक कबुली

मिळालेल्या माहितीनुसार, भोंदू खरात कोठडीत विविध आजारांच्या चक्रव्यूहात अडकला आहे. त्याचे शरीर विविध व्याधींमुळे आतून पोखरलं आहे. बीपी, शुगर, भगंदर, बद्धकोष्ठता, पॅरालिसिस अशा आजारांनी त्याला ग्रासले असून त्याला औषधांचे सेवन करावे लागत आहे. दिवसाला डजनभर गोळ्या खाव्या लागत आहे. (Nashik Crime)

दुसरीकडे पोलिसांकडून होणाऱ्या सततच्या चौकशीमुळे तो तणावात असून त्याचे वजन देखील घटले आहे. १७ दिवसांत त्याचे वजन ७ किलोंनी घटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याला १८ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याचे वजन ७९ किलो भरले होते. मात्र त्याचे वजन आता सात किलो कमी झाल्याची माहिती आहे.

Ashok Kharat Health Update, Custody Condition
Ashok Kharat : एका तरुण मुलीचा मृत्यू अन् टाकला कुटिल डाव, खरातने उभारलेल्या ईशान्येश्वर मंदिरच्या जमिनीबाबत हादरवणारी माहिती समोर..

अशोक खरातला पॅरालिसीसमुळे एक हात वर करता येत नाही. तो रोज डॉक्टरांच्या सल्लाने औषधे घेत आहे. एकीकडे आजारांवर मात करण्यासाठी सुरु असलेला औषधांचा मारा तर दुसरीकडे पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा अशा चक्रात तो अडकला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com