Ashok Kharat  sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat : अशोक खरातच्या मोबाईलमध्ये राजकीय नेत्यांची नावं डमी नावाने सेव्ह, बाहेर येण्याच्या भीतीने अनेकांचे धाबे दणाणले

Ashok Kharat case : अशोक खरात प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. कोर्टात सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने राजकीय तसेच प्रशासकीय क्षेत्रातील लोकांचे धाबे दणाणले आहेत.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : नाशिकचा वासनांध भोंदूबाबा अशोक खरात याचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. रविवारी खरातला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने खरातला आणखी ३ दिवसांची कोठडी सुनावली. त्यामुळे अशोक खरात हा आता 1 एप्रिलपर्यंत तुरुंगातच मुक्कामी असेल.

सुनावणीवेळी भोंदूबाबा अशोक खरात यांच्या वकिलांनी पोलीस कोठडीच्या मागणीला जोरदार विरोध केला. मात्र, सरकारी वकिलांनी पोलिस कोठडीची मागणी लावून धरली. खरातबाबत अद्याप अनेक गोष्टींचा तपास करायचा असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने खरातची 1 एप्रिलपर्यंत म्हणजेच ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

दरम्यान खरात प्रकरणाचा तपास एसआयटी पथक करीत आहे. आयपीएस तेजस्वी सातपुते या पथकाच्या प्रमुख आहेत. पथकाने खरातचा मोबाईल जप्त केला होता. मोबाईलमधील डेटा प्राप्त करण्यासाठी तो फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला देण्यात आला होता. एसआयटीने फॉरेन्सिककडून मोबाईल डेटाची क्लोन कॉपी घेतली आहे. खरातच्या मोबाईलमध्ये राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील व्यक्तींचे मोबाईल नंबर हे डमी नावाने सेव्ह करण्यात आल्याची शक्यता आहे असा गौप्यस्फोट सरकारी वकिलांनी केला.

दरम्यान क्लोन कॉपीच्या तांत्रिक विश्लेषणातून ही नावे उघड होण्याची शक्यता आहे. या क्लोन डेटाबाबत अशोक खरातकडे चौकशी केली जाणार असल्यानचे न्यायालयासमोर एसआयटीने (SIT ) ने स्पष्ट केले. मात्र, क्लोन डेटामुळे अनेकांची नावे उघड होण्याची शक्यता असल्याने राजकीय तसेच प्रशासकीय क्षेत्रातील अनेकांचे धाबे दणाणल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, भोंदू खरात एसआयटीच्या चौकशीत तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करीत नसल्याची माहिती एसआयटीने न्यायालयात दिली. तसेच अशोक खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर केला आहे. त्याची समक्ष चौकशी करायची आहे. महिलांचे लैंगिक शोषण करत असताना महिलांना खाण्यासाठी पेढे, पिण्यासाठी खारट कडवट पाणी देत होता. हा पेढा खाल्ल्यानंतर व पाणी पिल्यानंतर महिलांना मळमळ, गरगर होत व त्यांचे डोके जड पडत आणि त्यानंतर भोंदू अशोक खरात सांगायचा तसे या महिला करत होत्या, हे नेमकं काय आहे याचा तपास करायचा आहे.

कारण यातूनच खरात महिलांचे लैंगिंक शोषण करीत होता. मात्र, महिलांना गुंगी यावी असे तो काय करत होता. ते गुंगीकारक पदार्थ तो कोठून आणात असे याबाबत कोणतीही माहिती खरातने पथकाला दिलेली नाही, असं न्यायालयाला सांगण्यात आलं.

अशोक खरात ने भोंदूगिरी करत आजवर किती आणि कोठे कोणाच्या नावावर मालमत्ता खरेदी केली, याचा तपास करायचा आहे. खरातला यात कोणी मदत केली का, यात राजकीय लोकांचा सहभाग आहे का? या सर्व बाबींचा तपास करायचा असल्याने संशयित अशोक खरात याला वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT