

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणामुळे महत्त्वाच्या पदांचा राजीनामा दिला आहे.
अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत या प्रकरणात आधीच कारवाई झाली असती तर नुकसान टळले असते, अशी खंत व्यक्त केली.
Mumbai News : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापवले असून रूपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून पाय उतार व्हावं लागलं आहे. तसेच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशध्यक्ष पदाचाही राजीनामा द्यावा लागला आहे. दरम्यान आता या प्रकरणात ४० हून अधिक आमदारही अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी, खरात प्रकरण भयानक प्रकरण असून आता अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाई केल्यानंतर हे प्रकरण मूळापर्यंत गेलं. मात्र या प्रकरणाविषयी गर्व वाटायची गरज नाही. हे प्रकरण आधीच बाहेर यायला हवं होतं. खरातवर आधीच कारवाई केली असती तर खूप स्त्रियांचं जीवन वाचलं असतं, अशी प्रतिक्रिया देत खंत व्यक्त केली आहे.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने एकीकडे रूपाली चाकणकरांना महिला आयोगाच्या अध्यक्षासह पक्षाच्या महिला प्रदेशध्यक्ष पदावर पाणी सोडावे लागले आहे. आता तर तपास करणाऱ्या पोलिस आणि एसआयटीने त्यांना समन्स बजावल्याचेही बोलले जात आहे. यामुळे त्यांचा पाय आता आणखी खोलात गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर खरात याच्या 'शिवनिका' संस्थेवर संचालक असणे त्यांच्या अंगलट आले आहे. याच संस्थेमार्फेत अनेक आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचे आता उघड झाले आहे. दरम्यान फक्त चाकणकरच का असा सवाल विरोधक करत असून मुख्यमंत्री खरात याच्याशी संबंधित ४० आमदारांवर कारवाई करणार का असे विचारणा करत आहेत.
दरम्यान खरातला आज न्यायालयात हजर केले असता त्याला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणावरून सर्वस्तरावरून प्रतिक्रिया येत असताना आता झी २४ तासच्या कार्यक्रमात अमृता फडणवीस खरातप्रकरणावर चांगल्याच संतापल्याच्या दिसल्या.फडणवीस म्हणाल्या, “हे प्रकरण भयानक असून आता तापासात बऱ्याच गोष्टी बाहेर येत आहेत. पुढेही येणार आहेत. अशा पद्धतीने डोळे बंद करून बाबांवर विश्वास ठेवणं उचित नाही. अंधविश्वासाने घात होतो.
यामुळे आपल्याला डोळे उघडे ठेवून जगणं आवश्यक आहे. आपण आपल्या ग्रंथांचा आधार घेतला पाहिजे. सर्वकाही आपल्या आत आहे. आपण एकदम पूर्ण आहोत. आपले आत्पेष्ट किंवा आपल्या गुरुंशिवाय आपल्याला कोणाचीच गरज नाही. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. अशा बाबा बुवाबाजीला प्रोत्साहन देऊ नका. तर असं काही होत असेल तर त्यावर आणि त्याबाबांचा बहिष्कार करा. त्यावेळी सरकार आपल्याला मदत करेलच, असाही विश्वास अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला.
तसेच श्रद्धा आणि अंधश्रद्धेत एकच फरक असून श्रद्धा आपल्या विचारांवर, वेदांवर आणि चांगलेपणावर असली पाहिजे. घरी बसून फळ पाहिजे म्हणून तुम्ही कोणाकडे गेलात आणि शॉर्टकट्स शोधला तर ती अंधश्रद्धा आहे. आपण तसे वागलो तर श्रद्धा स्वतः च्या आतून निघून जाते. आपण आपल्या भविष्याबाबत अनिश्चित असतो तेव्हा आपण इथे तिथे जातो, असेही त्या म्हणाल्या. तर मनात ठाम विश्वास, सातत्याने मेहन आणि आदर्शांच्या मार्गावर चालत राहिलो तर शा कोणत्याही बाबांची गरज भासत नाही, असेही त्या म्हणाल्या.
तर खरात प्रकरणावर भाष्य करताना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाई केली. त्यांच्यामुळे हे प्रकरण मूळापर्यंत गेलं असे बोलले जात आहे. यावर भाष्य करताना अमृता फडणवीस म्हणाल्या, याविषयी गर्व वाटायची गरज नाहीय. कारण एवढं झाल्यावर आपण त्याच्यापर्यंत पोहचलो. पण हे प्रकरण आधीच बाहेर आलं असतं. त्याच्यापर्यंत आधीच पोहचलो असतो, आधीच कारवाई केली असती, तर खूप स्त्रियांचं जीवन वाचलं असतं. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हे प्रकरण आलं आणि त्यानंतर कारवाई झाली. जे खूप आधीच व्हायला पाहिजे होतं असे बोलत त्यांनी आपली खंत व्यक्त केली.
1. अशोक खरात प्रकरण काय आहे?
हे भोंदूबाबाशी संबंधित वादग्रस्त प्रकरण असून त्यात अनेक गंभीर आरोप आहेत.
2. रुपाली चाकणकर यांनी राजीनामा का दिला?
या प्रकरणाशी नाव जोडले गेल्यामुळे त्यांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिला.
3. अमृता फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली?
त्यांनी हे गंभीर प्रकरण असून आधीच कारवाई झाली असती तर नुकसान टळले असते, असे म्हटले.
4. 40 आमदार अडचणीत येणार का?
या प्रकरणात अनेक आमदारांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
5. या प्रकरणाचा पुढील परिणाम काय होऊ शकतो?
राजकीय दबाव वाढू शकतो आणि व्यापक चौकशीची मागणी होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.