police investigation in Ashok Kharat case Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat case New Update : अशोक खरात प्रकरणात नाशिकमधील 'प्रसिद्ध' डॉक्टरची एन्ट्री; धक्कादायक कनेक्शन समोर

Nashik famous doctor controversy Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; नाशिकमधील एका प्रसिद्ध डॉक्टरचा धक्कादायक संबंध समोर आला. संपूर्ण बातमी वाचा.

Rashmi Mane

महाराष्ट्रभरात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक घडामोड समोर आली आहे. स्वतःला अध्यात्मिक शक्ती असलेला व्यक्ती म्हणून भासवणाऱ्या अशोक खरातचा गुन्हेगारी पाय दिवसेंदिवस अधिक खोल जात असल्याचे स्पष्ट होत आहे. आतापर्यंत त्यांच्यावर 5 गुन्हे दाखल झाले असून त्यात फसवणूक, छळ आणि लैंगिक शोषण यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे.

या प्रकरणाच्या तपासात आता नाशिकमधील एका प्रसिद्ध डॉक्टरचे नाव पुढे आले आहे. एका पीडित महिलेच्या गर्भपाताशी संबंधित गुन्ह्याच्या चौकशीत, महापालिकेतील एका डॉक्टरमार्फत खरातला गर्भपातासाठी लागणाऱ्या गोळ्या पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. या माहितीनंतर तपास यंत्रणांनी संबंधित डॉक्टरांच्या भूमिकेवर लक्ष केंद्रीत केले असून त्यांना लवकरच चौकशीसाठी समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे.

तपासादरम्यान असेही समजते की, काही नामांकित डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या व्यक्तींशी खरातचे संबंध असावेत. या माध्यमातूनच गर्भपातासाठी लागणारी औषधे उपलब्ध करून दिली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे संपूर्ण प्रकरण अधिक गंभीर बनले असून वैद्यकीय क्षेत्रातील काहींची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.

अशोक खरात महिलांना त्यांच्या वैयक्तिक समस्या, कौटुंबिक अडचणी किंवा आरोग्याशी संबंधित प्रश्न सोडवून देण्याचे आश्वासन देत त्यांचा विश्वास जिंकत होता. “अवतारी पुरुष” असल्याचा दावा करत तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असे. त्यानंतर त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक अत्याचार केल्याचे तपासातून समोर आले आहे.

यामध्ये काही महिलांना गरोदर राहिल्यानंतर त्यांना गुपचूप गर्भपाताच्या गोळ्या दिल्या जात असल्याचेही उघड झाले आहे. या औषधांचा पुरवठा नेमका कुठून होत होता, तसेच त्यामागे कोणते डॉक्टर किंवा सोनोग्राफी केंद्र सहभागी होते का, याचा सखोल तपास सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात पुढील काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT