Nashik crime : महाराष्ट्र पुन्हा हादरला! 'दैवी शक्ती'च्या नावाखाली भोंदू बाबाने महिलेला थेट लॉजवर नेलं; आधी कुंडात अंघोळ, नंतर ओल्या वस्त्रानिशी...

Nashik Fake Baba Case : या घटनेतील पीडित महिलेचे कुटुंब मुलीच्या लग्नातील अडथळ्यांमुळे टेन्शनमध्ये होते. त्यामुळे हे घरगुती तणावावर तोडगा काढण्यासाठी या महिलेचे कुटुंबीय धरणगाव येथील महेशगिरी याच्या मठात गेले होते.
Nashik Fake Baba Case | Woman Assault News
A symbolic image showing police investigation in a fake baba case in Nashik, highlighting rising crimes linked to superstition.Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 23 Apr : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भोंदूगिरीच्या घटना उजेडात येत आहेत. नाशिकचा भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे तर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अशातच आता नाशिकमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

ती म्हणजे नाशिकच्या निफाड तालुक्यातील धरणगाव येथील एका भोंदू बाबाने कौटुंबिक समस्या दूर करण्याच्या नावाखाली एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. महिलेचे लैंगिक शोषण केलेल्या महेशगिरी महाराज उर्फ महेश दिलीप काकडे या भोंदूवर लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे कुटुंब मुलीच्या लग्नातील अडथळ्यांमुळे टेन्शनमध्ये होते. त्यामुळे हे घरगुती तणावावर तोडगा काढण्यासाठी या महिलेचे कुटुंबीय धरणगाव येथील महेशगिरी याच्या मठात गेले होते.

यावेळी भोंदू बाबाने महिलेला बाहेरची बाधा असल्याचं सांगून भीती घातली आणि दैवी विधीच्या नावाखाली तिला एका कुंडात अंघोळ करायला लावून ओल्या वस्त्रानिशी उंबराच्या झाडाला फेऱ्या मारायला लावल्या. त्यानंतर काही दिवसांनी भोंदूने या महिलेला व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवायला सुरूवात केली.

एकदा त्याने असाच मेसेज पाठवत दैवी विधीसाठी एकांतात यावे लागेल, असं सांगून तिला नाशिकमध्ये बोलावलं. त्यानंतर तिला नाशिक-त्र्यंबक रोडवरील एका लॉजवर नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला.

Nashik Fake Baba Case | Woman Assault News
Satara Politics: आमदार महेश शिंदे म्हणतात, शिवसेनेच्या नव्हे, तर स्वत:च्या ताकदीवर निवडून आलो; मंत्री शंभूराज देसाईंनी ठणकावलं

यावेळी, "माझ्या गळ्यात रुद्राक्षाची माळी असून माझ्यात दैवी शक्ती आहे, माझे कोणी काही करू शकत नाही", अशी धमकी देत त्याने महिलेवर अत्याचार केला आणि तिचे आक्षेपार्ह फोटोही काढल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या पीडित महिलेने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि हा सर्व प्रकार नाशिक ग्रामीण पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार, लासलगाव पोलिसांनी महेशगिरी काकडे विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Nashik Fake Baba Case | Woman Assault News
Sunetra Pawar : "अजितदादांच्या पश्चात पहिली निवडणूक, साहेबपण आले नाहीत?"; प्रश्न विचारताच सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी म्हणाल्या, "सगळ्याच बाजूंनी..."

मात्र, अशा भोंदूबाबांच्या वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. शिवाय महिलांनी देखील असं भोंदूंच्या जाळ्यात अडकू नये यासाठी महिलांमध्ये जनजागृती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com