Ashok Kharat Case  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या केबिनच्या काचा पाहून SIT पथक थक्क, आत काय चालायचं ते बाहेरच्याला काही केल्या...

Ashok Kharat case : भोंदूबाबा अशोक खरातने नाशिकमधील ज्या कार्यालयात शेकडो महिलांचे लैगिंक शोषण केले त्या कार्यालयाची सलग तीसऱ्या दिवशी एसआयटी पथकाने झडती घेत पंचनामा केला.

Ganesh Sonawane

Nashik Politics : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची सुनावणी रविवारी (दि.२९) नाशिक जिल्हा न्यायालयात पार पडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने खरातची 1 एप्रिलपर्यंत म्हणजेच ३ दिवसांची पोलीस कोठडी वाढवली आहे.

तत्पूर्वी भोंदू खरातविरोधात न्यायालयात भक्कम पुरावे सादर करता यावेत यासाठी एसआयटी पथकाने त्याची कसून चौकशी केली. त्याच्या नाशिकमधील कॅनडा कॉर्नर येथील ओकस पॉपर्टी कार्यालयाची एसआयटी पथकाने शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी झडती घेतली. त्याच्या याच कार्यालयात त्याने महिलांचे लैगिंक शोषण केल्याचे समोर आले आहे. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली.

दरम्यान शनिवारी एसआयटी पथकाने खरातच्या कार्यालयाची तपासणी केली असता एक गोष्ट पोलिसांच्या नजरेत भरली. अशोक खरातच्या केबिनमधील अत्युच्च दर्जाच्या काचा पाहून पोलिस थक्क झाले. कारण बाहेरून केबिनच्या आतले दृश्य दिसू नये याची पुरेपूर काळजी खरातने घेतली होती.

केबिनची प्रत्येक काच अतिगडद काळ्या रंगाची बसविली आहे. अत्यंत उच्च दर्जाच्या काळ्या काचांचा दर्जा व वापर पाहून तपास पथकही आश्चर्यचकित झाले. कितीही प्रयत्न केला तरी बाहेरून आतमधले काहीही दिसत नव्हते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

संशयित खरातने याच कार्यालयात अनेक महिलांवर अत्याचार केल्याचे बोलले जात असून, आणखी काही पीडित तक्रार करण्यासाठी पुढे येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत खरातविरोधात तब्बल दहा गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातले आठ गुन्हे हे अत्याचाराशी संबधित तर दोन गुन्हे फसवणुकीच्या संबधित आहे.

दरम्यान रविवारी झालेल्या सुनावणीत सरकारी वकिलांनी खरातच्या पोलीस कोठडीची मागणी लावून धरली. भोंदु अशोक खरात हा मास्टर माइंड असल्याने तो तपास यंत्रणांना सहकार्य करत नाही, त्यामुळे तपासाला वेळ लागतो आहे असा युक्तिवाद त्यांनी केला. सदर प्रकरणात कोणकोणत्या बाबींचा तपास करायचा बाकी आहे, त्याची माहिती वकिलांनी न्यायधीशांना दिली. त्यानंतर न्यायालयाने खरातच्या कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ केली. त्यामुळे खरातचा जेलमधील मुक्काम वाढला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT