Ashok Kharat Case_SIT Chief IPS Tejsvi Satpute 
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat: खरात प्रकरणात SITच्या तपासात काय काय निष्पण्ण झालं? तपास प्रमुखांनी दिली ए-टू झेड माहिती

Ashok Kharat: त्यामुळं अशोक खरात प्रकरणात सर्वसामान्य जनतेमध्ये जी उलट सुलट चर्चा सुरु आहे. यापार्श्वभूमीवर तपास नेमका कसा सुरु आहे? याबाबत सविस्तर माहिती आता समोर आली आहे.

सरकारनामा ब्युरो

Ashok Kharat Case: स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु अशोक खरात याच्या एसआयटी तपासात अनेक बाबी निष्पण्ण झाल्या आहेत. यामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश आहे? याची एटू झेड माहिती एसआयटी प्रमुख IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे. त्यामुळं अशोक खरात प्रकरणात सर्वसामान्य जनतेमध्ये जी उलट सुलट चर्चा सुरु आहे. यापार्श्वभूमीवर तपास नेमका कसा सुरु आहे? याबाबत सविस्तर माहिती आता समोर आली आहे.

SITच्या तपासात काय निष्पण्ण झालं?

अशोक खरात प्रकरणात एकूण ११ गुन्हे एसआयटीकडं तपासासाठी आहेत. या विशेष तपास पथकात एकूण २४ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. खरातविरोधात नाशिक आणि नगर जिल्ह्यात एकूण १२ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये ९ गुन्ह्यांचा तपास एसआयटी करत आहे. २ गुन्ह्यांचा तपास अहिल्यानगर पोलीस आणि १ गुन्ह्याचा तपास नाशिक शहर पोलीस करत आहेत. पण अशोक खरात विरुद्ध नसलेले पण या प्रकरणाशी संबंधित २ गुन्ह्यांचा तपासही एसआयटीकडं आहे. म्हणजेच एकूण ११ गुन्ह्यांचा तपास एसआयटी करत आहे. यांपैकी ८ गुन्हे हे महिला लैंगिक अत्याचारांसंबंधी तर उर्वरित ३ गुन्हे हे फसवणूक आणि अंधश्रद्धा विरोधी कायदा, सावकारी अधिनियम २०१४ अंतर्गत आहेत. तसंच यामध्ये आर्थिक गुन्ह्यांची इतर कलमं लागू आहेत.

आजपर्यंतच्या तपासात ३० पेक्षा अधिक साक्षीदारांकडं चौकशी करण्यात आली आहे. साक्षीदार आणि पीडितांकडं जी चौकशी करण्यात आली त्यातून आरोपी हा पीडित व्यक्ती आणि कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता, त्यांना भीती दाखवत होता. खडे, चिंचोके, रुद्राक्ष, पूजाविधी या गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसा उकळत होता. स्वतःकडं दैवी शक्ती असल्याचं तो महिलांना भासवत होता. त्यांच्या कुटुंबियांच्या मृत्यूची तसंच बदनामी करण्याची धमकी दाखवून त्यांचं लैंगिक शोषण करत होता. त्याचबरोबर ईशान्येश्वर मंदिराच्या परिसरात अंधारात हातचलाखीनं दैवी शक्ती असल्याचं भासवून समाजात सातत्यानं अंधश्रद्धा पसरवण्याचं कामही करत होता हे निष्पण्ण झालं आहे.

पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडिओ जे प्रसारित झाले होते त्याच्या ४,६५० लिंक्स डिलिट करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट वारंवार टाकणाऱ्या अकाऊंटला कायमस्वरुपी काढून टाकण्यात आलेले आहेत. पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी २ गुन्हे दाखल झाले आहेत. यांपैकी एक नागपूर आणि एक अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल करण्यात आले आहेत. यांमध्ये आत्तापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

एसआयटीकडं असणारे सर्वच तपास हे अतिशय संवेदनशील प्रकारचे असल्यामुळं त्याविषयीची जी माहिती सांगणं शक्य आहे ती माहिती या पत्रकार परिषदेद्वारे देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असंही यावेळी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी सांगितलं. या प्रकरणात ईडीनं दखल घेतलेली आहे, त्यांनी एसआयटीकडं याप्रकरणी जी माहिती मागितली ती सर्व आम्ही त्यांना पुरवलेली आहे. भविष्यात देखील ईडीला आम्ही पूर्ण सहकार्य करणार आहोत, असंही एसआयटीच्या टीमनं स्पष्ट केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT