Ashok kharat-kalpana kharat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat : जेलमध्ये असतानाही अशोक खरातची कमाई सुरुच ; कुंभमेळा रिंग रोड प्रकल्पातून 3 कोटींचा धनलाभ, पत्नीसह दोन्ही मुली होणार मालामाल

Ashok Kharat linked to Nashik Kumbh Mela Ring Road : भोंदू अशोक खरातसह त्याच्या कुटुंबियांना आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रिंग रोडसाठी होणाऱ्या भूसंपादनातून पैसै मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Ganesh Sonawane

Nashik Crime News : नाशिकमधील भोंदू अशोक खरात याने आपल्याकडील कथित शक्तीच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले. याशिवाय त्याने लोकांची फसवणूक करत कोट्यावधींची माया जमवली आहे. ईडीकडून यासंदर्भात चौकशी सुरू असताना आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका मोठ्या प्रकल्पासाठी खरात कुटुंबाची जमीन संपादित केली जाणार असून, त्या बदल्यात त्याला कारागृहात असताना देखील मोठा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा होणार असून त्या पार्श्वभूमीवर 'बाह्य रिंग रोड' हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी शासनाकडून भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाच्या भूसंपादनात अशोक खरात आणि त्याच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या जमिनी जात आहेत. या भूसंपादनाच्या मोबदल्यात खरात कुटुंबाला सुमारे ३ कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती पुढे येत असून साम टीव्ही ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

गवळणे शिवारातील जमिनीच्या बदल्यात अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरातला 82 लाख 83 हजार रुपये मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. पाथर्डी शिवारातील भूसंपादनापोटी खरातच्या दोन्ही मुली, म्हणजेच तृप्तबाला आणि सृष्टी खरात यांना 1 कोटी 82 लाख रुपये मिळणार असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे एकाबाजूला खरात जेलची हवा खात असताना, दुसरीकडे मात्र त्याची कमाई सुरु असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, या भूसंपादन प्रक्रियेत खरातसोबत आर्थिक व्यवहार केल्याने निलंबित करण्यात आलेले व जमिनीत भागिदार असलेल्या उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांच्या पत्नीलाही लाखो रुपये मिळण्याची शक्यता आहे. नाशिकमधील पार्थर्डी शिवारातील ४० गुंठे जागेच्या सातबाऱ्यावर भांडेची पत्नी व खरातच्या मुलीचे नाव आढळल्यानंतर भांडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

दरम्यान, अशोक खरात प्रत्यक्ष खरेदी प्रक्रियेत उपस्थित राहण्याची शक्यता नसल्याने दर कमी होऊ शकतात, असंही समोर येत आहे. भूसंपादनाचा फायदा घेण्यासाठी दोन्ही मुलींना उपस्थित राहणं आवश्यक आहे. दरम्यान खरातच्या पत्नीला देखील मोबदला मिळणार असल्याने फरार कल्पना खरात समोर येणार का? असा सवाल उपस्थिती होत आहे.

दरम्यान खरात सध्या ईडीच्या रडारवर असल्याने खरातला हा सरकारी मोबदला मिळतो की तपास यंत्रणा या आर्थिक व्यवहारांवर टाच आणतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. खरातसोबत आर्थिक व्यवहारात सहभागी असलेले देखील तपास यंत्रणांच्या रडारवर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT