

Ashok Kharat News : कोपरगाव येथील समता पतसंस्थेतील बनावट खात्यातून मोठ्या प्रमाणावर पैसे वर्ग करण्यात आले. हे खाते कॅप्टन अशोक खरात याने आपल्या फायद्यासाठी वापरले. ईडी कडून त्याचा शोध सुरू आहे.
आता या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. समता पतसंस्थे प्रमाणेच सिन्नरच्या जगदंबा पतसंस्थेतही मोठा घोटाळा उघड झाला आहे. पतसंस्थेत कॅप्टन अशोक खरात साठी 32 खाते उघडण्यात आली होती.
या संदर्भात पतसंस्थेचे अध्यक्ष आणि कॅप्टन खरात याचा निकटवर्तीय नामकर्ण आवारे याला ताब्यात घेण्यात आले आहे. जगदंबा पतसंस्थेतील पैसे खरातच्या पत्नीच्या नावे जमिनी खरेदी करण्यासाठी वापरण्यात आले. त्यासाठी बँकिंग नियमांचे उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे नामकर्ण आवारे हाच खरातच्या जमीन व्यवहारांचा 'मास्टर माईंड' असल्याची चर्चा आहे.
जगदंबा पतसंस्थेचे अध्यक्ष नामकर्ण आवारे याने संबंधित खात्यांसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड नसताना व्यवहार केले. दोन लाखांची मर्यादा असताना आठ लाखांहून अधिक पैसे वर्ग झाले. हे पैसे कॅप्टन खरात याच्या पत्नीच्या नावे जमीन खरेदीसाठी वापरल्याचा संशय आहे.
याबाबत सिन्नर पोलिसांनी आवारे याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या कॅप्टन अशोक खरात हा देखील सिन्नर पोलिसांच्या कोठडीत आहे. खरात गेल्या 52 दिवसांपासून विविध पोलिसांच्या कोठडीत आहे.
आवारे हा कॅप्टन खरात याच्या शिवनीका ट्रस्टचा माजी सचिव आहे. आवारे पदाधिकारी असताना ट्रस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले होते. या व्यवहारातील पैशांचा वापर कशासाठी झाला? याचा शोध प्रामुख्याने सिन्नर पोलीस घेत आहेत.
कोपरगाव येथील समता आणि सिन्नर येथील जगदंबा या दोन्ही पतसंस्थांमधील 132 बनावट खाते आढळले आहेत. या खात्यातील पैसा प्रामुख्याने जमीन खरेदीसाठी वळविण्यात आला. त्यात मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य आणि बेनामी व्यवहार असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे खराब प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. कॅप्टन खरात याच्या पत्नीला अद्याप अटकपूर्व जामीन मंजूर झालेला नाही. त्यामुळे पोलीस खरातच्या पत्नीची ही चौकशी करण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.