Ashok Kharat Case  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat : अशोक खरातसोबतच्या व्हायरल व्हिडिओंनी महिलांना टाकलं नैराश्यात, 8 ते 9 महिलांची मानसोपचार तज्ज्ञांकडे धाव..

Ashok Kharat case : भोंदू अशोक खरातच्या जाळ्यात अडकलेल्या पीडित महिला आता नैराश्यात असून त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसल्याचे समोर आले आहे. या महिलांनी आता मानसोपचार तज्ज्ञांकडे धाव घेतली आहे.

Ganesh Sonawane

Nashik Ashok Kharat case : नाशिकमधील वासनांध भोंदूबाबा अशोक खरात याने शेकडो महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केले. दरम्यान, त्याचे असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने देशभरात खळबळ उडाली. आता खरातकडून शोषण झालेल्या पीडित महिलांची मनस्थिती सध्या प्रचंड बिघडल्याची माहिती समोर आली आहे.

पीडित महिला प्रंचड मानसिक तणाव व नैराश्यात असून यातील जवळपास 8 ते 9 पीडित महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेत अपॉइंटमेंट घेतल्याची माहिती समोर येत आहे. यातील काही महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे रीतसर उपचार सुरू केले आहेत.

अशोक खरातने त्याच्या नाशिकमधील कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात भोंदूगिरीच्या नावाखाली अनेक महिलांचे लैगिंक शोषण केले. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यातून अनेक पीडित महिलांचे चेहरे दिसत असून बहुतेक महिलांची ओळख उघड झाली. पोलिसांनी व्हिडीओ व्हायरल केल्यास किंवा मोबाईलमध्ये ठेवल्यास थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा देऊनही हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते.

सायबरतज्ज्ञांच्या मदतीने पोलिसांनी अनेक आक्षेपार्ह व्हिडीओ विविध वेबसाईटवरुन हटवले. मात्र, तोपर्यंत अनेक महिलांची ओळख, चेहरे उघड झाले. त्यानंतर आता या पीडित महिला सध्या प्रचंड नैराश्याच्या गर्तेत अडकल्याची माहिती मिळत असून त्यांना एकटे पडल्याची भावना सतावत आहे. कारण या महिलांना आता आपल्याच घरात तोंड लपवून राहावे लागत असल्याने नैराश्याचा सामना करावा लागत आहे. म्हणूनच त्या आता ही परिस्थिती कशी हाताळायची यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत.

दरम्यान पीडित महिलांना तपास यंत्रणांकडून अज्ञात स्थळी बोलावून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. यावेळी पीडित महिलांना पोलिस देखील मानसिक आधार देण्याचा पुरेपुर प्रयत्न करत आहेत. या महिलांना पोलिसांनी कोणतेही मानसिक दडपण न घेता विश्रांतीचा सल्ला दिला आहे. तसेच सायबर पोलिसांकडून आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर सातत्याने नजर ठेवली जात आहे. (Nashik Crime)

दरम्यान या प्रकरणाचा तपास सध्या एसआयटीचे पथक करत आहे. खरातचा मुलगा व बायको दोघेही फरार असून पोलिस त्यांच्या शोधात आहेत. यापूर्वी खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याची पोलिसांनी चौकशी केली होती. मात्र तो त्यानंतर आता फरार झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT