Ashok Kharat Call History : एकनाथ शिंदेंचा अशोक खरातला 17 वेळा फोन, तटकरेंचा 8 वेळा अन् चाकणकर..., सुषमा अंधारेंनी सगळी काॅल हिस्ट्री बाहेर काढली

Sushma Andhare Eknath Shinde Rupali Chakankar : कुठल्या नेत्याने अशोक खरातशी किती वेळा संपर्का केला. खरात त्यांच्यासोबत किती वेळ बोलला, याची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे.
Call records showing multiple conversations between Eknath Shinde–Ashok Kharat and Rupali Chakankar–Sushma Andhare spark political debate in Maharashtra.
Call records showing multiple conversations between Eknath Shinde–Ashok Kharat and Rupali Chakankar–Sushma Andhare spark political debate in Maharashtra. sarkarnama
Published on
Updated on

Sushma Andhare News : अशोक खरात प्रकरणात रोज नवे नवे खुलासे होत आहे. खरात शोषण केलेल्या महिलांकडून पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात येत आहे. त्याचे जमीनचे व्यवहार देखील तपासले जात आहेत. खरात हा राजकीय नेत्यांच्या संपर्कात होता हे देखील समोर आले आहे. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खरातच्या संपर्कात असलेल्या नेत्यांची काॅल हिस्ट्रीच बाहेर काढली.

कुठल्या नेत्याने खरातशी कितीवेळा संपर्का केला. खरात त्याच्यासोबत किती वेळ बोलला याची माहिती अंधारे यांनी आपल्या सोशल मिडिया हँडलद्वारे दिली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 17कॉल आहेत. तर, शिंदे यांचे सर्वात जास्त संभाषण 21 मिनिटांचे आहेत, असे अंधारे यांनी म्हटले आहे.

'अशा व्यक्तीसोबत एकनाथ शिंदे यांचे 17 कॉल झाले आहेत (10 इनकमिंग आणि 7 आऊटगोईंग) तर ते कशा संदर्भात झाले आहेत ते त्यांनी सांगणं गरजेचं आहे.चंद्रकांत पाटील आणि सुनील तटकरे यांचे प्रत्येकी आठ कॉल आहेत. हे सगळे नॉर्मल कॉल आहेत व्हाट्सअप बद्दल माहिती नाही.', असे देखील त्यांनी म्हटले आहे.

Call records showing multiple conversations between Eknath Shinde–Ashok Kharat and Rupali Chakankar–Sushma Andhare spark political debate in Maharashtra.
Ashok Kharat Solapur Connection : अशोक खरातचं सोलापूर कनेक्शन उघड; माजी आमदाराकडून खरातच्या मुलीला 32 लाखांचा फ्लॅट भेट

रुपाली चाकणकरांचे 177 काॅल

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, 'व्हाट्सअपची माहिती मिळत नसते. आता समजा पाहायला गेलं तर सर्वाधिक संपर्क कोणासोबत झाला आहे तर तो कुटुंबातील सदस्या आहे आणि त्यानंतर रुपाली चाकणकर यांच्यासोबत आहे. रूपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल खरातला झाले आहे. तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांचे 236 कॉल आहेत. 33 हजार पेक्षा जास्त सेकंड रूपाली चाकणकर यांच्यासोबत सोबत बोलणं झालं आहे.'

Call records showing multiple conversations between Eknath Shinde–Ashok Kharat and Rupali Chakankar–Sushma Andhare spark political debate in Maharashtra.
Ashok Kharat case : खरात प्रकरणाचे 'सीक्रेट' सीएम फडणवीसांकडेच उघड करणार! अंधारेंच्या विधानाने सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले; कोणता मोठा गौप्यस्फोट होणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com