

Mumbai hawala racket Ashok Kharat : भोंदू अशोक खरात प्रकरणात रोज नवनवीन कारनामे समोर येत असून आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. अशोक खरात हा मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधून हवाला रॅकेट चालवत असल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे.
मुंबईतील नामांकित पंचतारांकित हॉटेलमध्ये यासाठी १२ महिने (३६५ दिवसांसाठी) एक रुम बुक असायची अशी माहिती समोर आली आहे.
या रुमचे भाडे दिवसाला २० ते २५ हजार रुपयांच्या सुमारास असल्याचा अंदाज असून, वर्षभरात सुमारे एक कोटी रुपये भाडे भरण्यामागे काय गौडबंगाल होता याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे. संबधित हॉटेलमधील आलिशान खोलीत कोट्यवधींच्या आर्थिक गैरव्यवहारांचे धागेदोरे दडले असल्याचा संशय पोलिस यंत्रणांना आहे.
ही रुम खरातचा पुणे येथील आर्थिक सल्लागार ललित पोफळे याच्यासाठी राखीव असायची अशीही माहिती समोर येत आहे. पोफळे हा खरातच्या ट्रस्टवर विश्वस्त म्हणूनही कार्यरत होता. त्याने केलेली आर्थिक उलाढाल चक्रावून टाकणारी असून पोफळेमार्फत राखीव ठेवलेल्या या आलिशान खोलीमध्ये खरातच्या उपस्थितीत दिग्गज राजकीय नेते व बड्या उद्योजकांच्या बैठका होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
याच अलिशान खोलीतूनच खरात हवालाचे रॅकेट चालवत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच खोलीतून देश-विदेशात पैसे पाठविण्याचा काळा धंदा सुरू असल्याचाही संशय तपास यंत्रणांना आहे. हायप्रोफाईल व्यक्तींना सापळ्यात अडकवत त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी या खोलीचा वापर झालेला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, भोंदू खरात ऑस्ट्रेलिया, दुबई यासह चार पाच देशात हवालाच्या माध्यमातून Money Laundering करत असल्याची तसंच खरातने भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट राजकीय नेत्यांचे हजारून अधिक कोटी या देशांमध्ये पाठवले असल्याचं कळत आहे.
त्यामुळे या प्रकरणाची केंद्रीय संस्थानी सुद्धा चौकशी करणे गरजेचं आहे. हा विषय राष्ट्रीय सुरक्षेला सुद्धा आवाहन देणारा असल्याने राज्य सरकारकडे पुरेसे पुरावे आले असतील तर गृह विभागाने देखील या प्रकरणाचा राजकीय गोळाबेरजेसाठी वापर न करता सखोल चौकशी केली पाहिजे अशी मागणी रोहित पवार यांनी केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.