Ashok Kharat controversy News update: महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणी अटकेत असणाऱ्या नाशिकचा भोंदू अशोक खरात याचे रोज नवीन कारनामे समोर येत आहे. खरात यांच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली आहे. काल (रविवारी) तपासात अनेक महत्वाच्या बाबी समोर आल्या आहेत.
एसआयटीसोबत स्थानिक नागरिकांनीही खरात यांच्या कार्यपध्दतीवर संशय घेत अनेक आरोप केले आहेत. खरात हा दर शनिवारी आणि रविवारी न चुकता मिरगाव येथील आपल्या आलिशान फार्म हाऊसवर राहत असे. त्याची लाईफस्टाईल सराईत गुंडासारखी असल्याचे समोर आले आहे.
दररोज सकाळी तो १० ते १२ किलोमीटर सायकलिंग करत असे. मात्र, सायकलिंग करताना तो आपल्या कंबरेला उघडपणे बंदूक लावून फिरत असे. बंदूकीचा धाक दाखवत त्याने संपूर्ण मिरगाव परिसरात आपली दहशत पसरवली होती, ज्यामुळे कोणीही त्याच्याविरुद्ध कुणीही तक्रार देण्यास पुढे येत नसे.
दहशतीचा वापर करून खरातने परिसरातील अनेक गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याची माहिती समोर येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देण्यास विरोध केला, त्यांना धमकावणे आणि त्यांच्यावर विविध कारणांनी खोटे गुन्हे दाखल केले. तसेच त्यांना न्यायालयीन कचाट्यात अडकवण्याचे काम खरातने केले असल्याची तक्रार पीडित शेतकऱ्यांनी केली आहे.
सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ईशानेश्वर मंदिरात भोंदूबाबाने बनावट साप, वाघ ठेवले होते. अघोरी पूजा करताना खरात साप, वाघ निघाल्याचे दाखवत अनेक जणांना आश्चर्याचा धक्का देत त्यांचा विश्वास संपादित करीत असे. अशा प्रकारे भक्तांना घाबरवून पैसे उकळण्याचा खरातचा फंडा होता.
मंदीरात नकली साप आणि वाघ ठेवून खरात भीतीचं वातावरण निर्माण करायचा. रिमोट कंट्रोलने सापाच्या आणि वाघाच्या हालचालींनी चमत्कार दाखवत लोकांची फसवणूक करीत असल्याचे तपासाचे आढळले आहे. संमोहन आणि अघोरी विधींच्या नावाखाली त्याने भाविकांकडून लाखो पैसे उकळले आहे.
विविध खडे हे चमत्कारीत खडे असल्याचे सांगून खरात हा १०० रुपयांच्या वस्तूला भाविकांच्या आर्थिक परिस्थितीनुसार १० हजार ते १ लाखांपर्यंत विक्री करत गंडवायचा. लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अशोक खरात याच्याविरोधात ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास सध्या एसआयटी आणि नाशिक पोलिस करत आहे. अशोक खरात प्रकरणात आता एसआयटीकडून तपासाला वेग आला आहे. ईशान्येश्वर मंदिराच्या पुजाऱ्यासह बंगल्यातील कामगारांची चौकशी एसआयटीमार्फत केली जात आहे. मंदिराचा पुजारी, वॉचमन आणि देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तब्बल ८ तास चौकशी करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.