LPG Gas Cylinder: गॅस सिलिंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय; गॅस कंपन्यांना आदेश, आता किती किलो वजनाचा सिलिंडर मिळणार?

LPG cylinder News Weight Change: केंद्र सरकारचा गॅस सिलिंडरबाबत मोठा निर्णय. 14.2 किलो सिलिंडरऐवजी 10 किलो सिलिंडर देण्याचे गॅस कंपन्यांना आदेश दिले आहे.
LPG Supply Stability and New Booking Rules
LPG Supply Stability and New Booking RulesSarkarnama
Published on
Updated on

LPG Cylinder Big Decision:अमेरिका-इराण-इस्राइलमध्ये युद्धामुळे भारतामध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस सिलिंडर मिळत नसल्यामुळे नागरिक चिंतेत आहेत. गॅस एजन्सीबाहेर गॅस सिलिंडरसाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. अशातच आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) वितरणात मोठा महत्वाचा बदल केला आहे. युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने सिलिंडर वितारित करण्याऱ्यांना आदेश दिला आहे. घरगुती वापराचा गॅस सिलिंडर नागरिकांना आता अर्ध्याच वजनाचा मिळणार आहे.

यापूर्वी घरगुती वापराचा गॅस सिलिंडर 14.2 किलोच्या प्रमाणात नागरिकांना येत होता. मात्र, आता हा घरगुती वापराचा गॅस 8 ते 10 किलोच्या प्रमाणात नागरिकांना देण्यात येणार आहे. सिलेंडर तोच राहणार आहे. मात्र, त्यामध्ये गॅस आठ ते दहा किलोच्या प्रमाणात भरण्याचे आदेश गॅस कंपन्यांना देण्यात आले आहेत.

LPG Supply Stability and New Booking Rules
Rupali Chakankar News: महापालिका निवडणुकीत पराभव ते महिला आयोगाच्या अध्यक्षा; अशी आहे रुपाली चाकणकरांची राजकीय कुंडली

कमी वजनाच्या या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत किती असणार, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. जेवढा गॅस असेल तेवढे पैसे आकारले जाणार आहेत. सध्या आपल्याकडे असलेले 14.2 किलोचे सिलेंडर संपल्यानंतर नवीन सिलेंडर 8 ते 10 किलोच्या प्रमाणात भरण्यात येणार आहेत.

LPG Supply Stability and New Booking Rules
Ashok Kharat News: कॅप्टन खरातचा मुखवटा टराटरा फाटणार! तपासाची जबाबदारी धडाकेबाज IPS अधिकाऱ्याकडे!

यानंतर तुम्ही बुक केलेला गॅस सिलिंडर कमी वजनाचा असल्याने तो अर्थातच कमी दिवस पुरणार आहेत. त्यामुळे सामान्य घरातील दैनंदिन गणित बिघडणार आहे. या निर्णयावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आधीच गॅस तुटवडा आहे. त्यात आणखी पाच ते सहा किलो कमी वजनाचा सिलिंडर मिळणार, असल्याचे स्वयंपाक कसा करायचा असा प्रश्न गृहिणींना पडला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com