Ashok Kharat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat Controversy : अशोक खरातला अजुनही नेत्यांच्या मदतीची अपेक्षा, पोलिसांसमोर तोंड उघडेना? नीरज जाधव समोर आला अन्...

Ashok Kharat Nashik Police : अशोक खरातला अटक झाल्याने अनेक राजकीय नेते धास्तावले आहेत. दुसरीकडे खरातला अद्यापही राजकीय नेते मदतीला धावून येतील अशी अपेक्षा आहे.

Sampat Devgire

Ashok Kharat News : अशोक खरात प्रकरणात पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी सरकारने एसआयटी देखील स्थापन केली आहे. मोठे अधिकारी, राजकीय नेते हे खरातचे शिष्य होते. त्यामुळे या प्रकरणात त्यांचा काही संबंध आहे का? याचा देखील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

पोलिसांकडून या प्रकरणाचा तपासा सुरू आहे. मात्र, त्यांच्याकडून नवीन माहिती माध्यमांना दिली जात नाही. त्यामुळे अशोक खरात हा पोलिसांना सहकार्य करत नसल्याचा तर्क लावला जात आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पोलिस त्याची चौकशी करत असताना तो रडकुंडीला आला होता.

कॅप्टन अशोक खरात याची पोलिसांच्या विशेष पथकाने स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. या संदर्भात त्याने दिलेल्या माहितीची खातर जमा केली जात आहे. त्यातील विसंगती शोधण्यात अधिकारी व्यग्र आहेत.

या संदर्भात कॅप्टन खरातला अडचणीत आणणारा आणि हे प्रकरण पोलिसात नेण्यास कारणीभूत असलेल्या नीरज जाधव हा पोलिसांच्या ताब्यात आहे. महिलांच्या वादग्रस्त व्हिडिओ त्याच्याकडे असलेल्या पेन ड्राईव्ह मधून पोलिसांना मिळाल्या आहेत. यासंदर्भात जाधव यांच्याकडून तपासाला दिशा देणारी माहिती मिळाली आहे.

पोलिसांनी शुक्रवारी ऑफिस बॉय निरज जाधव आणि कॅप्टन अशोक खरात यांना समोरासमोर बसवून प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे अशोक खरात उत्तरे देताना वारंवार रडकुंडीला येत होता. सध्या एकाच महिलेची तक्रार आहे. त्यातून अन्य महिलांच्या अत्याचाराची माहिती पोलिसांना हवी आहे.

यासंदर्भात उच्चपदस्थ अधिकारी आणि राजकीय नेते खरातच्या संपर्कात होते. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासावर त्याचा परिणाम होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडून या संदर्भात कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे खरातला अद्यापही राजकीय नेते मदतीला येतील अशी अपेक्षा असावी, असे बोलले जात आहे.

संपत्ती कशी जमवली?

महिला अत्याचाराशी निगडित असलेल्या या प्रकरणातून आर्थिक घोटाळ्याच्या गंभीर बाब देखील पुढे आली आहे. कॅप्टन खरात याच्याकडे एवढे पैसे आले कसे? यावर सध्या पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्या दृष्टीने विविध माहिती घेतली जात आहे.

'त्या' महिलांची माहिती मिळवण्याचे काम

अशोक खरात प्रकरणात तपास करणाऱ्या एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते आणि त्यांच्या पथकाकडून प्रामुख्याने महिला अत्याचारावर केंद्रित करण्यात आले आहे. पेन ड्राईव्हमध्ये सापडलेल्या अन्य महिलांची नावे संकलित करण्याचे काम पोलीस करीत आहेत. सध्या खरात याच्या विरोधात तीन गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे वाढण्याची शक्यता सूत्रांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT