Ramesh Hinge Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ramesh Hinge: “मंत्री, अधिकाऱ्यांची वर्दळ होती…”; अशोक खरातच्या पीएचा मोठा खुलासा

Ashok Kharat Case: महिलांचा लैंगिक छळ करणारा स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु अशोक खरात याच्याकडं अनेक मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी मंडळी येत असतं.

Amit Ujagare

Ramesh Hinge: महिलांचा लैंगिक छळ करणारा स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु अशोक खरात याच्याकडं अनेक मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी मंडळी येत असतं. त्याचबरोबर या सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांना खरात कशा पद्धतीनं उपचार करत होता, याचा खुलासा अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीनं म्हणजेच खरातचा खासगी सचिव अर्थात पीए रमेश हिंगे यांनी केला आहे. खरात प्रकरण चर्चेत आल्यापासून गेल्या पाच दिवसांपासून हिंगे फरार असल्याचं बोललं जात होतं. पण आता हिंगे यांनी समोर येत साम टीव्हीशी प्रत्यक्ष संवाद साधला आहे. त्यामुळं आता पोलीस देखील हिंगे यांच्याकडं याप्रकरणाचा अधिकचा तपास करतील.

हिंगेनं नेमका काय केलाय खुलासा?

अशोक खरातचा पीए रमेश हिंगेनं सांगितलं की, मी एक शिक्षक असून कॅप्टन खरातचा मी कधीही पीए नव्हतो आणि आत्ताही नाही. मी त्यांचा मॅनेजर देखील नाही. केवळ सुट्टीच्या दिवशी मी मंदिरावर स्वयंसेवक म्हणून जात असतो. या ठिकाणी अनेक लोक अधिकारी मंडळी येत असतात त्यांना बघण्यासाठी मी तिथं जात असतो. पण खरातच्या इतर काळ्या कारनाम्यांशी माझा काहीही संबंध नाही. मी त्यांच्या संस्थेमध्ये कुठल्याही पदावर नाही. ट्रस्टी नाही, मॅनेजर नाही, पीए देखील नाही.

ईशान्येश्वर मंदिरात जाण्यासोबतच मी अशोक खरातच्या फार्म हाऊसवर देखील जात होतो, असं खुद्द रमेश हिंगे यांनी स्पष्ट केलं असून त्यांचं फार्म हाऊस कसं आहे तिथल्या बागा कशा आहेत? हे पाण्यासाठी मी जात होतो. या फार्महाऊसवरचं वातावरण कसं होतं? या प्रश्नाच उत्तर देताना रमेश हिंगे यांनी सांगितलं की, रविवारच्या दिवशी माझ्यासारखे अनेक भाविक खरातच्या फार्महाऊसवर असायचेच. त्यांच्या दर्शनासाठी किंवा त्यांना बघण्यासाठी यायचे. आम्ही केवळ स्वयंसेवक म्हणून कोणाला चहापाणी देणं इतकचं काम माझं असायचं.

फार्म हाऊसवर कॅप्टन अशोक खरात हा प्रत्येक रविवारी असायचा. काही वेळात फक्त बाहेर असल्यानंतर महिनाभरही इथं नसायचा. या ठिकाणी येणारे लोक हे चांगल्या प्रकारचे प्रतिष्ठित लोक असयाचे खरातला भेटण्यासाठी ते यायचे. हा ग्रामीण भाग असल्यानं आम्हाला या मान्यवर लोकांना बघण्याची उत्सुकता असायची तर आम्ही देखील जायचो. या ठिकाणी जे कोणी मान्यवर यायचे त्यांना मी ओळखतो पण वैयक्तिकरित्या कोणाचं नाव सागणं संयुक्तिक होणार नाही. पण यामध्ये मंत्री आणि मोठं मोठे अधिकारी येत होते, असंही रमेश हिंगे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT