Ashok Kharat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ashok Kharat : तर तुमचे नामोनिशान नष्ट करू.. भोंदू खरातच्या माणसांनी अंनिस कार्यकर्त्यांना दिल्या होत्या धमक्या

Ashok kharat Threat Andhashraddha Nirmoolan Samiti : भोंदू अशोक खरातच्या संस्थेतील ट्रस्टीने अंनिसला धमकी दिली होती. प्रकरण दाबण्यासाठी दबाव टाकला होता. अशी माहिती अंनिसने दिली आहे.

Ganesh Sonawane

Nashik Politics : भोंदू बाबा अशोक खरात विरोधात दिवसेंदिवस गंभीर आरोप समोर येत असून आतापर्यंत त्याच्यावर आठ गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिस व एसआयटी संयुक्तपणे खरात प्रकरणाचा तपास करत आहे.

आपल्याकडी कथित शक्ती व भोंदूगिरी करुन त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे तक्रारीतून पुढे आले आहे. तसेच धार्मिक विधी व विशेष पूजांच्या आमिषाने त्याने हायप्रोफाईल भाविकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट केल्याचेही समोर आले आहे.

महिला लैंगिक शोषण प्रकरणात भोंदू ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात हा सध्या पोलिस कोठडीत आहे. त्याचे रोज नवनवीन कारनामे समोर येत आहेत. दरम्यान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या वीस वर्षापासून त्याच्या मागावर होती अशी माहिती समितीने दिली आहे.

खरातचे काळेकारनामे सुरु असताना २००७ मध्ये अंनिसकडे तक्रार आली होती. त्यानुसार अंनिसचे कार्यकर्ते महेंद्र दातरांगे व प्रा डॉ. सुदेश घोडेराव हे भोंदू कॅप्टन खरातच्या कार्यालयात गेले होते.

तो करत असलेले कृत्य हे अंधश्रद्धा युक्त असून चुकीचे आहे, अशी जाणीव कार्यकर्त्यांनी त्याला करून दिली. त्यावर मी निवृत्त कॅप्टन आहे. माझ्याकडे रिवॉल्वर आहे, अशी धमकी त्याने कार्यकर्त्यांना दिली. त्यावर कार्यकर्त्यांनी न घाबरता आव्हान दिले. त्यावर त्याने सावध रहा, अशी धमकी दिली. त्यानतंर भोंदू खरातने त्याचे कार्यालय तीन महिने बंद ठेवले होते मात्र काही दिवसांनी त्याने पुन्हा चालू केल्याचे अंनिसने सांगितले.

२०१३ मध्ये अंनिसचे सिन्नर येथील कार्यकर्ते अरुण घोडेराव यांच्याशी ईशान्येश्वर मंदिराच्या एका ट्रस्टीने वाद घालून धमकी दिली होती. तुम्ही अंनिसवाले अनेक भोंदूबाबाच्या मागे लागतात पण आमचे कॅप्टन खरात तसे नाही. तुम्ही जर काही केले तर तुमचे नामोनिशान नष्ट करू. त्यामुळे आमच्या मागे लागू नका, असे धमकावले होते. (Nashik News)

त्यानंतरही अंनिसकडे पीडित संपर्क करत होते पण धाडसाने पुढे येऊन पोलिसात तक्रार देण्यास ते घाबरत होते. मात्र कधीतरी एक दिवस त्याच्यावर गुन्हा दाखल होईल, अशी अंनिसची खात्री होती त्याप्रमाणे त्याच्यावर आता अनेक गुन्हे दाखल झाल्याचे अंनिसने म्हटले आहे.

आम्हाला कायमच अनेक धमक्या येत असतात. पण आम्ही विवेकवादी कार्यकर्ते असल्याने कधीच तक्रार दाखल करत नाही. डॉ दाभोळकरांची आम्हाला शिकवण होती. ते शहीद झाल्याने आम्ही मारण्याच्या भीतीवर विजय मिळवला आहे. असं अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT