Ashok Kharat Case: उद्धव ठाकरेंचीही खरातवर 'मेहरबानी'; 'मातोश्री'वरील मॅडमच्या आग्रहाखातर 'शिवनिका'ला पाणी मंजूर?

Shiv Sena leader Sheetal Mhatre allegations UBT:अशोक खरात प्रकरणात पाणी कनेक्शन देण्यावरून शीतल म्हात्रे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर आरोप केले आहेत. संपूर्ण माहिती वाचा.
Shiv Sena leader Sheetal Mhatre allegations UBT
Shiv Sena leader Sheetal Mhatre allegations UBTSarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat case:राजकीय दबाव वापरून भोंदूबाबा अशोक खरातने मिरगावच्या पाण्याची टाकी स्वत:च्या शिवनिका संस्थानासाठी वळवली आली होती. कॅप्टन अशोक खरातच्या संस्थानला पाणी देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात काही मंत्र्यांनी आग्रह केला होता.

हे मंत्री कोण होते याची चर्चा सुरू असतनाच शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवनिका संस्थानासाठी पाणी कोणी मंजूर केले याचा जीआर (GR) नुकताच समोर आला आहे.

मिरगावात खरातने ग्रामपंचायत निधीतून मंजूर झालेली पाणीपुरवठ्याची टाकी राजकीय दबावाचा वापर करत शिवनिका मंदिर ट्रस्टसाठी वळवण्यात आल्याचे समोर आलं आहे. दारणा धरणातून गोदावरी नदीत जे पाणी सोडले जाते त्यातूनच कॅप्टन अशोक खरातच्या संस्थानाला ३९ लाख लिटर पाणी देण्याचा सरकारी निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात झाला होता. हा निर्णय कुणाच्या आग्रहाखातर झाला, याची माहिती शितल म्हात्रे यांनी शेअर केली आहे.

Shiv Sena leader Sheetal Mhatre allegations UBT
Ashok Kharat Case: अशोक खरातचा पाय आणखी खोलात; सातवा गुन्हा दाखल, कोणी केली होती तक्रार

क्रूरकर्मा खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी ही मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर देण्यात आली होती म्हणे…यही तो नही ‘ताज’ का राज? उबाठाला हा प्रश्न विचारलाच पाहिजे. ‘ताज का राज’ फुटला तर यांच्या तोंडचं पाणी पळेल, असे शीतल म्हात्रे यांनी म्हटले आहे.

Shiv Sena leader Sheetal Mhatre allegations UBT
Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणी पहिली मोठी प्रशासकीय कारवाई! अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना दणका; अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

काय आहे प्रकरण?

  • नाशिकमधील दारणा धरणातून अशोक खरात यांच्या शिवनिका संस्थेसाठी 39 लाख लिटर पाणी मंजूर करण्यात आले होते, त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते.

  • शिवनिकाला पाणी पुरवण्यासाठी धरणापासून 48 किलोमीटर लांब पाईपलाईन टाकण्यात आली होती. हे पाणी पिण्यासाठी आरक्षित दाखवले होते.

  • पण त्याचा वापर खरातच्या 21 एकरमधील आंब्याच्या बागेसाठी केला जात असल्याचा आरोप आहे. हा प्रस्ताव 25 जून 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मंजूर झाला होता. जयंत पाटील हे त्यावेळी जलसंपदा मंत्री होते.

  • मिरगावातील वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी ही टाकी मंजूर करण्यात आली होती. मात्र कॅप्टन खरातने आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करत ही टाकी देवस्थानासाठी पळवल्याचा आरोप होत आहे.

अशोक खरात प्रकरणात नेमण्यात आलेल्या एसआयटीच्या तपासाला आता वेग आला आहे. अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे बँक अकाऊंट सील करण्यात आले आहे. खरातचा शस्र परवाना जिल्हाधिऱ्यांनी रद्द केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाचे माजी अध्यक्षा सदस्य असलेल्या शिवनिका ट्रस्टचे बँक अकाऊंट सील करण्यात आले आहे. शिवनिकाच्या आर्थिक व्यवहाराचा तपास सुरू आहे. एसआयटीच्या तपास पथकाने मालमत्तेची माहिती मागवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com