Ashutosh Kale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar DCC Bank Election : लंकेंनी समर्थकाला बळ दिलं, पण आशुतोष काळेंनी मैदान मारलं! 626 मतांनी दणदणीत विजय; शरद पवारांच्या उमेदवाराचा धुव्वा

Ashutosh Kale wins Ahilyanagar DCC Bank election 626 votes, defeating Sharad Pawar NCP faction candidate Sudhir Mhaske amid Vikhe-Lanke political tussle : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आशुतोष काळेंचा दणदणीत विजय; सुधीर म्हस्के यांना केवळ 124 मते, विखे-लंकेतील राजकीय संघर्षाची चर्चा रंगली.

Pradeep Pendhare

Ahilyanagar District Bank Election Result : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगावमधील आमदार आशुतोष काळे यांनी खाते उघडले आहे. शेतीपूरक मतदारसंघातून आमदार आशुतोष काळे विजयी झाले असून, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुधीर म्हस्के यांचा पराभव केला.

आशुतोष काळे यांना 750, तर सुधीर म्हस्के यांना 124 मते मिळाली. आशुतोष काळे यांनी 626 मतांनी दणदणीत विजय मिळवला. शेतीपूरक मतदारसंघात एकूण 884 मतदार होते. आमदार काळे अन् म्हस्के यांच्यातील लढाईमागे मंत्री विखे पाटील आणि खासदार लंके यांच्यात शह-काटशहाचे राजकारण रंगले होते.

शेतीपूरक मतदारसंघातून अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आशुतोष काळे रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात 27 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. शेवटच्या दिवशी 26 उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर काळे यांच्याविरोधात एकमेव शरद पवार राष्ट्रवादीचे (NCP SP) सुधीर रावसाहेब म्हस्के यांची उमेदवारी राहिली होती. सुधीर म्हस्के यांची माघार होऊन काळे बिनविरोध होणार, असे सांगितले जात होते.

परंतु, खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी ऐनवेळी म्हस्के यांना बळ देत आमदार काळे यांना धक्का दिला होता. आमदार काळे यांचे मंत्री विखे पाटील राजकीय नेतृत्व करतात. खासदार लंकेंना पारनेरमध्ये मंत्री विखे पाटील यांनी राहुल शिंदे यांच्या रूपाने घेतले होते. खासदार लंकेंनी हे हेरल्यानंतर विखे पाटील समर्थक म्हणून, आमदार काळेंविरोधात उमेदवार म्हस्के यांच्या रूपात उभा केल्याची चर्चा होती. निकालाच्या दिवशी सुधीर म्हस्के यांना, आमदार काळेंच्या जवळपास देखील मतांच्या रूपाने दिसले नाहीत.

मतदानाच्या दिवशी काल, आमदार आशुतोष काळे, भाजप आमदार विवेक कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व चैताली काळे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. विशेषतः आमदार काळे यांची संपूर्ण यंञता शंभर टक्के मतदान होण्यासाठी पळापळ करीत होती. मंत्री विखे पाटील यांचे नातेवाइक तथा गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे देखील एकत्र आले होते. ही दिलजमाई कोपरगावच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली होती.

काळे-कोल्हे यांचे कोपरगावमधील प्रतिस्पर्धी राजकारण सर्वश्रुत आहेत. पण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील-काँग्रेस बाळासाहेब थोरात जिल्हा बँकेसाठी एकाच छताखाली, सहमती एक्स्प्रेसमध्ये एकत्र आल्यावर काळे-कोल्हे देखील एकत्र आले. जिल्हा बँकेत सुरवातीला 11 जणांची बिनविरोध निवड झाल्यात, त्यात बिपीन कोल्हे देखील बिनविरोध झाले आहेत. काळे-कोल्हे यांच्या सहमती एक्स्प्रेसने आशुतोष काळे यांचा विजयी मार्ग सोपा केला.

दोघांची मिळून जिल्ह्यात मोठी यंत्रणा उभी राहिली. परिणामी खासदार लंके यांच्या सहकार परिवर्तन पॅनलचे उमेदवार सुधीर म्हस्के कुठेच दिसले नाही. परंतु शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून, सुधीर म्हस्के यांनी देखील मतांची शंभरी पार करत 124 मते मिळवली. आशुतोष काळे यांनी त्यांच्या सहापट मते जास्त घेत, 750 मते मिळवली. याचबरोबर आशुतोष काळेंचा मोठा विजय मिळवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT