

Ahilyanagar District Cooperative Bank Election : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेत भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्क्यावर धक्के बसले आहे. जिल्हा बँकेच्या दहा जागेसाठी झालेल्या बँकेत, त्यांचे समर्थक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. मंत्री विखे पाटील यांचे समर्थक अंबादास पिसाळ यांचे चिरंजीव तुषार पिसाळ यांचा कर्जतमधून पराभव झाला आहे.
खासदार नीलेश लंके यांनी त्यांच्या कट्टर समर्थकाचा पराभव करताच, मंत्री विखे पाटील यांना हा दुसरा धक्का बसला आहे. मंत्री विखे पाटील-बाळासाहेब थोरात सहमती एक्स्प्रेसचे बिनविरोधाचे गणित येथेच फिस्कटले होते. भाजप विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी ज्योती शिंदे यांना बळ दिले होते.
सेवा सोसायटी कर्जत मतदारसंघात मंत्री विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) समर्थक अंबादास पिसाळ यांचे चिरंजीव तुषार पिसाळ आणि राम शिंदे समर्थक ज्योती शिंदे यांच्या लढत झाली. ज्योती शिंदे यांना 54 मते मिळाली, तर तुषार पिसाळ यांना 20 मते मिळाली. ज्योती शिंदे यांनी तब्बल 34 मतांनी विजयी मिळवला.
याच कर्जतच्या जागेवरून, राम शिंदे (Ram Shinde) आणि विखे पाटील यांच्यात चर्चा फिस्कटली होती. राम शिंदे यांनी जामखेड खालोखाल कर्जतची जागा बिनविरोध करण्याची मागणी विखे पाटील-थोरात सहमती एक्स्प्रेससमोर लावून धरली होती. चर्चा फिस्कटल्याने, तिथे निवडणूक लागली. राम शिंदे सहमती एक्स्प्रेसमध्ये का नाही, यावर बोलताना मंत्री विखे पाटील यांनी कर्जतच्या जागेचा उल्लेख केला होता.
कर्जत सेवा सोसायटीच्या मतदारसंघात 98.50 टक्के मतदान झाले होते. राम शिंदे यांनी मतदारसंघातील मतदार सहलीवर नेले होते. त्यांचे मतदान घडवून आणण्यासाठी राम शिंदे यांनी विशेष व्यूहरचना आखली होती. तशी ती मतदानाच्या दिवशी अंमलबजावणीत देखील आणली. मतदारांना मतदान केंद्रावर एकामागोमाग क्रमांकाच्या मतपत्रिका देण्यात येऊन, त्याचपद्धतीने मतदान घडवून आणले होते. या मतदान पद्धतीची जिल्ह्यात काल दिवसभर चर्चा होती.
राम शिंदे यांचे 51 मतदार होते, अधिकच मतदान खेचण्याची रणनीती त्यांनी आखली होती. ज्योती शिंदे यांना 54 मते मिळाली आहेत. त्यानुसार तीन जास्तीचे मते खेचली आहेत. ही मते कोणाची, अशी चर्चा रंगली आहेत. राम शिंदे यांनी मंत्री विखेंची मते खेचल्याची चर्चा आहे.
गेल्या वेळच्या निवडणुकीत, अशीच अंबादास पिसाळ यांच्याभोवती अशीच परिस्थिती होती. तरी त्यांनी विजयश्री खेचून आणला होता. परंतु यावेळी राम शिंदे यांनी ज्योती शिंदे यांच्या रूपाने मंत्री विखे पाटील यांच्याकडून विजयश्री खेचून घेतला. मंत्री विखे पाटील समर्थक अंबादास पिसाळ यांना या निवडणुकीत अति आत्मविश्वास नडल्याची चर्चा आहे. सहलीवर गेलेल्या मतदारांमधील बहुतांशी मतदार आपलेच आहेत, अशी वल्गना करत होते. परंतु राम शिंदेंच्या व्यूहरचनेत ते देखील अडकले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.