Ahilyanagar News : भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांना त्यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघात आव्हान ठरलेले भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांची बंडखोरी रोखण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू झालेत.
भाजप नेत्यांनी राजेंद्र पिपाडा यांना चार्टर प्लेन पाठवून मुंबईत बोलावून घेतले आहे. विखे-पिपाडा यांच्यातील राजकीय संघर्ष वरिष्ठ पातळीवर मिटतो की नाही, याकडे आता लक्ष लागलं आहे.
राजेंद्र पिपाडा हे भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे कट्टर समर्थक आहेत. शिर्डीतून ते नेहमी फडणवीस यांच्या संपर्कात असतात. परंतु त्यांचे मंत्री विखे यांच्याबरोबर कधीच पटले नाही. त्यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. अलीकडच्या काळात त्यांच्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी बैठक वाढवली होती. तसंच ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होते. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मंत्री विखेंविरोधात धाव घेतली होती. त्यांच्या उमेदवारी देखील विरोध केला होता. तसे पत्रव्यवहार देखील केले होते.
मंत्री विखे यांना उमेदवारी दिल्यास, भाजपची एक जागा कमी होईल, त्यामुळे शिर्डीतील (Shirdi) उमेदवार बदला, अशी राजेंद्र पिपाडा यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली होती. यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघात गाठीभेटीवर भर दिला होता. परंतु त्यांच्यावर गुंडांनी हल्ला केला. यावर पिपाडा यांनी गंभीर आरोप केले होते. नाराज पिपाडांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणुकीला समोरे जाण्याचा निर्धार केला होता.
विधानसभेसाठी काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजेंद्र पिपाडा यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. काल उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आज मुंबईतून भाजप श्रेष्ठींनी त्यांना चार्टर प्लेन पाठवून बोलावून घेतले. पिपाडा दाम्पत्य दोघेही चार्टर विमानाने मुंबईला रवाना झालं आहे.
याशिवाय पिपाडा यांनी त्यांच्याशी श्रेष्ठी काय चर्चा करणार, याचे आखाडे बांधले जात आहेत. तसंच पक्ष श्रेष्ठी राजेंद्र पिपाडा याची नाराजी कशापद्धतीने दूर करतात, याची देखील चर्चा आहे. पिपाडा यांची पक्षश्रेष्ठींशी झालेल्या भेटीनंतर मंत्री विखेंचा मार्ग सुकर होईल, असे दिसते.
पिपाडा यांनी विखेंविरोधात 2009 मध्ये निवडणूक लढली होती. अत्यंत चुरशीच्या लढतीत, पिपाडा यांचा 13 हजार मतांनी पराभव झाला होता. 2019 मध्ये मंत्री विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर भाजपची नगर जिल्ह्यात ताकद वाढली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विखे आणि पिपाडा या कट्टर विरोधकांचे मनोमिलन घडवण्यात यश आलं होते. आता पुन्हा ही शिष्टाई यशस्वी ठरणार का? याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.