Mahavikas Aghadi: 'मविआ'त पेच वाढला, पवारसाहेबांच्या उमेदवाराविरोधात शिवसेना ठाकरे आणि काँग्रेसची बंडखोरी

Ahmednagar City Assembly Constituency: अहिल्यानगर शहर मतदारसंघात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवाराने अर्ज दाखल करताच बंडखोरी निशाण फडकले गेले.
MVA News
MVA NewsSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News: अहिल्यानगर मतदारसंघात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला जागा सुटली. पक्षाकडून माजी महापौर अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर झाली. यानंतर लगेचच मविआत बंडखोरीचे निशाण फडकवण्यात आले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 'मविआ'तील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील इच्छुकांनी अर्ज दाखल करत दबावतंत्र वापरले. यावर अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत कसा तोडगा निघतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. खासदार नीलेश लंके यांनी यावर दिलेली प्रतिक्रिया देखील चर्चेत आहे.

अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात जागा सुटण्यापासून पेच होता. शेवटच्या क्षणी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाला सुटली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अभिषेक कळमकर यांना उमेदवारी जाहीर केली. यावर मविआतील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील इच्छुक आक्रमक झाले.

MVA News
Mahayuti News : महायुतीत बंडोबा वाढले, समजूत काढताना दमछाक होणार

विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करताना काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी अर्ज दाखल केला. त्यापाठोपाठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाने बंडाचे निशाण हाती घेतले. अहिल्यानगर शहर मतदारसंघ पहिल्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे उमेदवारी शिवसेनेला हवी होती, असा दावा करत बैठकांचे सत्र घेतले. या बैठकांमधील निर्णयानुसार जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

MVA News
Jayant Patil : 'घोषणाबाजांची खुर्ची जनताच हिसकावून घेणार'; जयंत पाटलांची भरपूर टोलेबाजी

कोतकर निवडणुकीच्या रिंगणात

तसंच, अहिल्यानगर शहर मतदारसंघात माजी महापौर संदीप कोतकर देखील इच्छुक होते. यासाठी त्यांनी जिल्हाबंदी उठवण्यासाठी न्यायालयात कायद्याची जोरदार लढाई लढली. यात त्यांना यश आलं नाही. उलट आणखी दोन गु्न्हे दाखल झाले. परंतु त्यांनी त्यांच्या पत्नी माजी उपमहापौर आणि केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी सुवर्णा संदीप कोतकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

सुवर्णा कोतकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. सुवर्णा कोतकर भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या त्या मेहुणी आहेत. त्यामुळे पुढं त्या निवडणुकीच्या रिंगणात कायम राहतात, याकडे लक्ष लागलं आहे.

भाजपच्या लोढांचा अर्ज

भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी देखील विकासाच्या मुद्यावर अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजप आणि संघ परिवारातील लोढा यांची नगर शहरात मोठी ताकद आहे. लोढा पुढं काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागलं आहे. भाजप आणि संघ परिवाराची ताकद त्यांना मिळाल्यास, महायुतीच्या उमेदवाराला त्याचा फटका बसू शकतो, असा राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

खासदार लंकेंची प्रतिक्रिया

'मविआ'तील बंडखोरी रोखण्याचं आव्हान खासदार नीलेश लंके यांनी पेललं आहे. यावर त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे. "निश्चितच यावर सकारात्मक तोडगा निघेल. कार्यकर्त्यांमध्ये काहीसा विसंवाद आहे. गंभीर प्रश्न नाही. मविआ एकसंघपणे निवडणुकीला समोरे जाईल", असा विश्वास खासदार लंके यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com