Pawar Vs Shinde : रोहित पवार अन् राम शिंदेंच्या नावाशी साधर्म्य असलेले 'एवढे' उमेदवार रिंगणात

Karjat Jamkhed Constituency: कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून राम शिंदे आणि रोहित पवार यांच्या नावासारखे प्रत्येकी दोघा-दोघांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.
Pawar Vs Shinde
Pawar Vs ShindeSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजप आमदार प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तींनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

आमदार शिंदे आणि आमदार पवार यांच्या नावासारखे प्रत्येकी दोघा-दोघांनी अर्ज दाखल केले आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघात 23 जणांनी 37 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी कर्जत-जामखेड तहसील कार्यालयात प्रचंड गर्दी होती. भाजप (BJP) आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नावाशी साधर्म्य असलेले राम प्रभू शिंदे आणि राम नारायण शिंदे (दोघे रा. कोळवडी, जि. बीड)यांनी अनुक्रमे ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्ष आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे भाजपचे आमदार प्रा. राम शंकर शिंदेंसह कर्जत-जामखेडमध्ये एकूण तीन राम शिंदेंनी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

Pawar Vs Shinde
Mahavikas Aghadi: 'मविआ'त पेच वाढला, पवारसाहेबांच्या उमेदवाराविरोधात शिवसेना ठाकरे आणि काँग्रेसची बंडखोरी

हाच कित्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याबरोबर झाला आहे. रोहित चंद्रकांत पवार (सरदवाडी, ता. जामखेड) आणि रोहित सुरेश पवार (सुपे,ता.कर्जत) या दोघांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आमदार रोहित पवार यांच्यासह एकूण तीन रोहित पवार उमेदवार झाले आहेत.

Pawar Vs Shinde
Pawar Vs Shinde : भाजप आमदार शिंदे कशात 'पटाईत'; आमदार पवारांनी भरगच्च सभेत सगळं सांगितलं

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागलं आहे. भाजप आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये थेट लढत होणार असल्याने कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात राजकीय आखाडा रंगणार आहे. दोन्ही पक्षांच्या नेते या मतदारसंघात सभा घेण्याचे नियोजन केले आहे.

राम शिंदे यांना 2019 च्या निवडणुकीच्या पराभवाचा वचपा घ्यायचा आहे, तर रोहित पवार यांना 2024च्या निवडणुकीत शिंदेंना पूर्ण पिक्चर दाखवायचा आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील मतदारांना संभ्रमात टाकण्यासाठी दोन्ही बाजूंनी एकाच नावाच्या व्यक्ती निवडणुकीत उभ्या केल्याची चर्चा आता रंगलीय.

विखे समर्थक पिसाळ, तर काँग्रेसचे शेवाळे निवडणुकीच्या रिंगणात

कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांची भूमिका निर्णायक असणार आहे. लोकसभा निवडणुकीला प्रा. राम शिंदे यांनी सुरवातीला विखेंवर नाराजी दाखवत, निवडणुकीपासून दूर राहिले होते. वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीने विखेंनी शिंदेंची नाराजी दूर केली. परंतु विखेंना पराभवाला समोरे जावे लागले.

आता विधानसभा निवडणुकीत विखे समर्थक तथा जिल्हा बँकेचे संचालक अंबादास शिंदे, अंबादास पिसाळ यांनी राम शिंदेच्यांविरोधात बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसंच काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शेवाळे यांनी देखील रोहित पवार यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत नाराजींची समजूत काढावी लागणार आहे. 4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत असून त्यानंतर लढतीचे चिन्हं स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com