Vaibhav Pichad  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vaibhav Pichad : अजितदादांची डोकेदुखी वाढली; भाजपचे वैभव पिचडांनी अपक्ष अर्ज भरला, बावनकुळे काय भूमिका घेणार?

Akole former MLA Vaibhav Pichad application was filled by the activists : माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या सेवेसाठी नाशिकच्या रुग्णालयात तळ ठोकून असलेले भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांच्या अनुपस्थितीत कार्यकर्त्यांनी त्यांचा निवडणुकीचा अर्ज भरला.

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : भाजपचे कोपरगावमधील विवेक कोल्हे यांना थांबवण्यासाठी दिल्लीतून प्रयत्न यशस्वी झाले. देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्याबरोबर त्यांच्यासाठी केलेली शिष्टाई यशस्वी झाली.

परंतु अकोले विधानसभा मतदारसंघात काय झालं? असा प्रश्न अकोल्यातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकार पिचड आणि त्याचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड यांचे कार्यकर्ते करू लागलं आहे. यातून कार्यकर्त्यांनी वैभव पिचड यांच्या अनुपस्थितीत कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला.

भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांचा अपक्ष अर्ज दाखल होणे म्हणजे, अजित पवार (Ajit Pawar) यांचे विद्यमान आमदार डाॅ. किरण लहामटे यांची डोकेदुखी वाढवली आहे. उमेदवार नसताना आणि कोणतेही राजकीय पाठबळ नसताना पिचड समर्थकांनी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बंडखोरांना आवाहन करत अर्ज भरू नका, असं म्हटलं होते. पिचड यांच्या अनुपस्थितीत त्यांचा अर्ज कार्यकर्त्यांनी भरल्यानंतर आता चंद्रशेखर बावनकुळे काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागलं आहे.

ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना ब्रेन स्ट्रोक झाल्यामुळे त्यांच्यावर नाशिकमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचे पुत्र वैभव देखील त्यांच्यासोबत तिथं आहे. याचदरम्यान निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. माजी आमदार वैभव पिचड वडील मधुकरराव यांच्या आजारपणामुळे रुग्णालयातच आहे. त्यामुळे पिचड कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन भाजपचे (BJP) माजी आमदार वैभव पिचड यांनी निवडणूक लढवावी, असा निर्णय घेतला.

कार्यकर्त्यांनी वैभव पिचड यांचा उमेदवारी अर्ज भरला आणि त्यावरील स्वाक्षरीसाठी नाशिक गाठले. तिथं वैभव पिचड अर्जावर स्वाक्षरीसाठी तयार नव्हते. वडिलांना विचारल्याशिवाय अर्जावर स्वाक्षरी करणार नाही, असा निर्णय त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. परंतु कार्यकर्त्यांनी अर्जावर स्वाक्षरी करणार नाही, तोपर्यंत रुग्णालयाच्या परिसरातून जाणार नाही, अशी भूमिका घेतली. रुग्णालयात कार्यकर्त्यांची वाढलेली गर्दी आणि आग्रहामुळे शेवटी वैभव पिचड यांनी अर्जावर स्वाक्षरी केली. कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत वैभव पिचड यांच्या अनुपस्थितीत निवडणुकीचा अर्ज भरला.

काळे-कोल्हे पॅटर्न अकोल्यात का नाही?

दरम्यान, कोपरगावमध्ये युवा नेते विवेक कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांच्या उमेदवारीवरून महायुतीत पेच निर्माण झाला होता. त्यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी पुढाकार घेत तोडगा काढला. कोल्हे मायलेकांची भाजप नेतृत्व केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक घडवून आणली. तिथंल्या निर्णयानंतर विवेक कोल्हे काहीस समाधान होत, पक्षाबरोबर थांबलेत. कोपरगावमध्ये कोल्हे-काळेंबाबत भाजप नेतृत्व पुढाकार घेऊन तोडगा काढू शकते, तर अकोलेमध्ये पिचड-लहामटेंबाबत का नाही? असा सवाल अकोल्यातील पिचड कार्यकर्त्यांनी करत आहेत.

आमदार लहामटेंच्या भूमिककडे लक्ष

माजी आमदार वैभव पिचड वडिल मधुकरराव यांच्या उपचारासाठी निवडणुकीपासून लांब राहिले, तरी त्यांचा विजय खेचून आणायचा, असा निर्धार पिचड कार्यकर्त्यांनी केला आहे. पिचड यांच्या कार्यकर्त्यांच्या या निर्धारामुळे आमदार लहामटे यांच्या गोठात अस्वस्थता पसरली आहे. आमदार लहामटे या सर्व घडामोडींवर अजितदादांकडे धाव घेऊन तोडगा काढण्याबाबत पाठपुरावा करत असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT