Shankarrao Gadakh : आता षडयंत्र, अटक होऊ शकते, महायुतीच्या मंत्रिपदाची ऑफर नाकारली; शिवसेना'UBT'चा आमदार गरजला

Shankarao Gadakh told the conspiracy of Mahayuti government : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार शंकरराव गडाख यांनी महायुतीचे षडयंत्र सांगितलं.
Shankarrao Gadakh
Shankarrao GadakhSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : महायुती सरकारने सत्तेत राहण्यासाठी काय काय केले, याची एक झलक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार शंकरराव गडाख यांनी सांगितली. महायुतीच्या राजकारणावर माजी मंत्री गडाख यांनी चांगलाच घणाघात केला.

"महायुती सरकारच्या सत्तेत सहभागी होण्यासाठी सुरवातीला मंत्रीपदाची ऑफर दिली. आपण ती नाकारली. एवढं करून थांबले नाहीत, तर खुनाचा गुन्हा दाखल व्हावा, यासाठी याचिका. आता 'मुळा' सहकारी कारखान्यासंदर्भात आयकर विभागाची नोटीस बजावली, वेळप्रसंगी अटक देखील होऊ शकते", असा गंभीर आरोप माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी केला.

शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जाहीर केलेल्या पहिल्या 65 जणांच्या यादीत माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. गडाख यांना उमेदवारी मिळताच, त्यांनी मेळावा घेऊन महायुतीच्या सत्ता राजकारणावर जोरदार टीका केली.

Shankarrao Gadakh
Maharashtra Assembly Elections: उमेदवार खिसा सैल सोडणार; खर्चाची मर्यादा एवढ्या लाखानं वाढली

शंकरराव गडाख म्हणाले, "महायुती (Mahayuti) सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी सुरवातीला मला मंत्रिपदाच्या पक्वान्नाचे ताट देण्यात आले. यानंतर मुंबईतील बांद्रा पोलिस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची तक्रार झाली. यानंतर खुनाच्या गुन्ह्यासाठी याचिका, आता तर रोजगारावर घाला घालण्यासाठी 'मुळा' सहकारी साखर कारखान्याला आयकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली". मागील दोन वर्षांचा हिशोब दिला म्हणून आयकर विभागाने नोटीस बजावली. परंतु आयकर विभागाकडून हिशोबासाठी कोणतेच पत्र आले नसल्याचा दावा, शंकरराव गडाख यांनी केला.

Shankarrao Gadakh
Aditya Thackeray : संपत्तीने कोट्यधीश असलेले आदित्य ठाकरेंवर आहेत एवढे गुन्हे

"कारखान्यानंतर आता शाळांच्या जागासंदर्भात देखील नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या जागा ताब्यात घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हक्क सरकार हिसकावणार का? जागा सरकार जमा करून काय साध्य कारायचं आहे? आता आरोप-प्रत्यारोप होतील. वेळप्रसंगी मला अटक होईल, पण आता थांबायचे नाही, आता लढणार असा", इशारा शंकरराव गडाख यांनी महायुती सरकारला दिला.

"मुळा-ज्ञानेश्वरी सहकारी कारखाने हे शेतकऱ्यांचे आहेत. याच कारखान्याला कर्ज सरकारने मंजूर केलं नाही. अडचणीच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलं नाही. उलट नोटीसा काढून वेगळाच डाव आखला जात आहे. परंतु हे सर्व आम्ही उलटून टाकणार", असा इशारा शंकरराव गडाख यांनी सरकारला दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com