Shankarao Gadakh Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena UBT : 137 कोटी थकवले, आयकर विभागाची नोटीस; शिवसेना'UBT'चे आमदार संतापले

Income Tax Department Notice to Mula Cooperative Factory: अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदार संघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार शंकरराव गडाख यांच्या ताब्यात असलेल्या मुळा सहकारी कारखान्याला थकीत करापोटी आयकर विभागाची नोटीस बजावली आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला घायाळ केलं जात आहे. त्यांचे समर्थक माजी मंत्री तथा आमदार शंकरराव गडाख यांच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा केला जात आहे.

आमदार गडाख यांच्या ताब्यात असलेल्या नेवाशातील मुळा सहकारी साखर कारखान्याच्या थकीत 137 कोटी रुपयांच्या करापोटी आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीत ही नोटीस आल्याने चर्चेला उधाणं आलं आहे. नोटीस मिळताच, शंकरराव गडाख संतापलेत.

शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार शंकरराव गडाख म्हणाले, "2022-23 मध्ये जे उत्पादन केले आहे, त्या उत्पादनावर आयकर विभागाकडून 137 कोटी रुपयांची नोटीस मुळा कारखान्याला आली आहे. राज्यासह इतर राज्यातील कारखान्यांकडून माहिती आहे की, अशी आयकर विभागाची नोटीस आली आहे का? तर अशा नोटीस कोणत्याही कारखान्याला आलेली नाही". मुळा कारखान्याला ज्या वर्षीचा उत्पादनावर आयकर विभागाची नोटीस आली आहे, त्यावर्षीचा आणि इतर वर्षाचा उत्पादन खर्च सारखाच आहे, असे शंकरराव गडाख यांनी सांगितलं. यावर आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही गडाख यांनी दिला.

आयकर विभागाने नोटीस बजावताना वरिष्ठांकडे दाद मागण्यावेळी कारखान्याला 137 कोटी रुपयांपैकी 40 टक्के रक्कम भरण्याचे फर्मावले आहे. आतापर्यंत कारखान्याने 40 लाख रुपये भरल्याची माहिती मिळते. अहिल्यानगर जिल्ह्यातील कारखान्यांना आता कर्ज मंजूर झालं आहे. मुळा कारखान्याचे 125 कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या (Election) रणधुमाळीत मुळा कारखाना ताब्यात असलेल्या शंकरराव गडाख यांची राजकीय कोंडी करण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. माजी मंत्री शंकरराव गडाख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीपासून भाजप नेवाशात वेगवेगळे राजकीय प्रयोग करत आहेत. हा देखील त्यातीलच प्रयोग असल्याची चर्चा रंगली आहे.

शंकरराव गडाख गेल्या सहा-सात महिन्यांपासून मतदारसंघात तळ ठोकून आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ते घोंगडी बैठका घेत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज विक्री सुरू झाली असून नेवासा मतदारसंघात आमदार शंकरराव गडाख आणि त्यांची पत्नी सुनीता गडाख यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी अर्ज नेले आहे. नेवासा विधानसभा मतदारसंघात 20 जणांनी 41 अर्ज नेले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT