Ahilyanagar News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभा निवडणुकीला समोरे जाताना अहिल्यानगर जिल्ह्यात काही जागांवर अदलाबदली केल्याची खात्रीलायक माहिती समोर आली. यातून अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय उलथापालथी होण्याची शक्यात आहे.
श्रीगोंद्यातून तसे संकेत मिळाले असून, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला सोडत काही तास होत नाही तोच, अनुराधा नागवडे उद्या मुंबईत मातोश्रीवर दाखल होत आहेत. अनुराधा नागवडे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश निश्चित असल्याचे त्यांचे पती राजेंद्र नागवडे यांनी माहिती दिली.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून श्रीगोंद्यातील नागवडे कुटुंबिय पावलं टाकत आहे. काँग्रेसमध्ये असलेले नागवडे दाम्पत्य, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महायुतीत श्रीगोंद्याच्या जागेचा पेच निर्माण झाले. भाजपच्या पहिल्या यादीत आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुचे यांना उमेदवारी जाहीर झाली. श्रीगोंद्यातील जागेवर भाजपचा शिक्कामोर्तब होताच, नागवडे दाम्पत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडली. पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिला.
अनुराधा नागवडे यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढणार असल्याचे सांगत अपक्ष किंवा येत्या दोन दिवसांत चिन्हं आमच्यासोबत असेल, असे सांगून निवडणुकीच्या मैदानात शड्डू कायम ठेवला. अनुराधा नागवडे यांचे पती राजेंद्र नागवडे यांनी पत्रकार परिषद घेत उद्या मुंबईत उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट घेऊन शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहोत, असे जाहीर केले.
श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी इथं मेळावा घेत नागवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले होते. पुढं काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नागवडे यांनी जाण्याच्या निर्णयानंतर श्रीगोंदा मतदारसंघात अनेक राजकीय गणित फिस्कटणार आहेत. साजन पाचपुते गेली वर्षभर निवडणुकीची तयारी करत आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी त्यांना मंत्रालयाची गाडी राणी लंके यांच्याबरोबर जातील, असे सांगून निवडणुकीच्या तयारीचे संकेत दिले होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अनुराधा नागवडे यांना संधी दिल्याने त्यांची उमेदवारी 'फिक्स' मानली जात आहे. यामुळे साजन पाचपुते यांच्यासमोर अडचणी वाढल्या आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत आता काय भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.