Rani Lanke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar Politics : राणी लंकेंना 'तुतारी'चा 'AB' फॉर्म; 'मविआ'तील इच्छुकांचं काय होणार?

Parner Assembly Constituency Rani Lanke got AB form of NCP SharadChandra Pawar party : पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना 'AB' फॉर्म मिळाल्याने महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेले कोणती भूमिका घेणार, याकडे आता लक्ष लागलं आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : शरद पवार यांचे पारनेरवरील प्रेम सर्वश्रुत आहे. लोकसभा निवडणुकीला सुजय विखे यांच्याविरुद्ध नीलेश लंके यांना शरद पवार यांनीच पारनेरमधून हेरलं होतं. आता त्यांनीच विधानसभा निवडणुकीसाठी देखील पारनेरमध्ये उमेदवार 'फिक्स' केलाय.

खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा 'AB' फॉर्म दिला गेला आहे. राणी लंके यांचा 'AB' फॉर्म पारनेर मतदारसंघातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आणला.

राणी लंके यांची उमेदवारी लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाकडून जवळपास निश्चित झाली होती. नीलेश लंके यांचा पारनेरमध्ये प्रचार करताना राणी लंके यांनी वाड्या-वस्त्या पायदळी तुडवल्या होत्या. याशिवाय लोकसभेपूर्वी नीलेश लंके यांनी राणी लंके यांचा चेहरा पुढं करून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात यात्रा काढली होती. नीलेश लंके यांच्या विजयात राणी लंके यांचा मोठा ठरला. तेव्हापासून त्यांची विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित मानली जात होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली होती. ही यात्रेनित्ताने पारनेरमधील निघोज इथं जयंत पाटील यांची सभा झाली. या सभेत जयंत पाटील यांनी नीलेश लंके यांनी उखाण्यात नाव घ्यायचं आणि आम्ही 'AB' फॉर्मवर सही करायची, असे जाहीरपणे सांगून राणी लंके यांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. यानंतर आता राणी लंके यांचा 'AB' फॉर्म पारनेरमधील सर्वसामान्य कार्यकर्ते घेऊन आले आहेत.

महायुतीकडून उमेदवार कोण?

राणी लंके यांना 'AB' फॉर्म मिळताच, पारनेरमधील महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील इच्छुकांचा हिरमोड झाली आहे. शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदेश कार्ले, तालुकाप्रमुख डाॅ. श्रीकांत पठारे पुढं काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागलं आहे. या दोघं काय भूमिका घेतात,याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. खासदार नीलेश लंके या दोघांची कशी समजूत घालतात, हे देखील पाहण्यासारखं राहणार आहे. याशिवाय महायुतीतून इथं कोणाला जागा सुटते आणि राणी लंकेंविरुद्ध कोण उमेदवार राजकीय मैदानात असेल, याची देखील चर्चा आहे.

ठाकरे आणि पवारांकडून 'AB' फॉर्म

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाकडून पारनेर विधानसभा मतदारसंघातून राणी लंके, घाटकोपर पूर्वमधून राखी जाधव आणि चिपळूण प्रशांत यादव यांना,तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून राजापूरमध्ये राजन साळवी आणि कुडाळ वैभव नाईक यांना 'AB' फॉर्म दिल्याची माहिती समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT