Nevasa Assembly Constituency: नेवाशात भाजप उमेदवार देणार का? महायुतीत बंडाळीची चिन्हं

BJP first candidate list : भाजपने पहिल्या 99 जणांच्या यादीत अहिल्यानगरमधील नेवासा विधानसभा मतदारसंघ वगळ्याने तिथं महायुतीकडून उमेदवार कोण याची चर्चा रंगली आहे.
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Political News: भारतीय जनता पक्षाने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. अहिल्यानगर जिल्ह्यातून पाच जणांना उमेदवारी दिली. परंतु नेवाशा मतदारसंघात भाजपचा माजी आमदार असताना देखील तिथं उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे या जागेसंदर्भात महायुतीत पेच असल्याचे चर्चेत जोराची हवा मिळाली आहे.

महायुतीमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रभाकर शिंदे यांचे नाव पुढं असून, भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे देखील उमेदवारी खेचून आणण्याच्या तयारीत आहेत. तसंच अजित पवारा यांची राष्ट्रवादी देखील या मतदारसंघात चाचपणी करत आहेत.

शिवसेनेचे (Shiv Sena) माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांचा नेवासा हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 2014 च्या निवडणुकीत या बालेकिल्ल्याला बाळासाहेब मुरकुटे यांनी भाजपचं कमळ हाती घेत सुरूंग लावला होता. परंतु 2019 च्या निवडणुकीत शंकरराव गडाख यांनी क्रांतीकारी शेतकरी पक्षाची स्थापना करत हा बालेकिल्ला परत हिसकावून घेतला. यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मंत्रीपद घेतले. आता 2024 च्या निवडणुकीला ते समोरे जात आहे. मी उद्धव ठाकरेंसोबत असे म्हणत शंकरराव गडाख यांनी निवडणुकीची तयारी केली आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Beed District Politics : 13 निवडणुकांमधून बीड जिल्ह्यातून 89 आमदार विधानसभेत; शिवाजीराव पंडितांमुळे एकमेव सुंदरराव सोळंके बिनविरोध!

महायुतीमधील भाजपने (BJP) इथं उमेदवार जाहीर झालेला नाही. तशी पहिल्यास ही जागा भाजपकडे आहे. बाळासाहेब मुरकुटे भाजपचे माजी आमदार आहे. ते पुन्हा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. परंतु महायुतीतून शिवसेनेने इथं दावा सांगितला आहे. प्रभाकर शिंदे शिवसेनेकडून इच्छुक असल्याचे सांगितले जाते. तशी त्यांनी फिल्डिंग देखील लावली आहे. शिवसेनेविरुद्ध शिवसेना, असा 'सामना' या मतदारसंघात घडवून आणण्याची राजकीय खेळी भाजप खेळताना आहे की काय? अशा चर्चा नेवाशा मतदारसंघात रंगली आहे.

अजितदादांची मुरकुटेंनी घेतली भेट -

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पुढील दोन दिवसांत सुरवात होईल. तत्पूर्वी ही जागा खेचून आणण्यासाठी भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांना वेगळा मार्ग चोखंदळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar), कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे भाजपच्या स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या भुवया देखील उंचवल्या आहेत. माजी आमदार मुरकुटे नेमका कोणता डाव टाकत, याची चर्चा सुरू झाली आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Junnar Constituency News : जुन्नरमध्ये महाविकास आघाडीत वाढलं टेन्शन ; शिवसैनिक पुन्हा 'मातोश्री' गाठणार!

माजी आमदार मुरकुटेंची मुंबईत 'फिल्डिंग' -

नेवाशा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपनेच लढावावी, असा आग्रह बाळासाहेब मुरकुटे यांनी दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींकडे धरल्याचा समजते. आता प्रत्यक्षात जागा जाहीर झाल्यानंतर पडद्यामागील सर्व राजकीय घडमोडी समोर येतील. नेवाशातील अनेक इच्छुकांना मुंबई आणि ठाणे इथं 'फिल्डिंग' लावली आहे. पुढील दोन दिवसात महायुतीमधील नेवाशातील उमेदवाराचा चेहरा स्पष्ट होईल, संकेत आहेत.

आमदार गडाखांचा एककल्ली कार्यक्रम -

महायुतीत ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला जाते की, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी जाते किंवा भाजप या जागेवर दावा कायम ठेवतो, याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे. दुसरीकडे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. संघटनेवर भर दिला आहे. त्यामुळे प्रचारात ते पुढं असल्याचं आता तरी चित्र दिसत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com