Rohit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ram Shinde : कोट्यधीश भाजप उमेदवार आमदार शिंदे झाले 'ट्रोल'; आमदार पवारांनी देखील साधलं टायमिंग

Karjat Jamkhed constituency: भाजप उमेदवार आमदार प्रा. राम शिंदे यांनी निवडणुकीसाठी नागरिकांना केलेल्या आर्थिक मदतीच्या आवाहनावर आमदार पवारांकडून जोरदार टीका.

Pradeep Pendhare

Ahilya Nagar News : भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांना समाज माध्यमावर ट्रोल करण्यात येत आहे. कारण, त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी नागरिकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले.

भाजपचे उमेदवार असलेले आमदार प्रा. राम शिंदे कर्जत-जामखेडमधून निवडणुकीच्या रिंगणात असून, त्यांनी आर्थिक मदतीसाठी समाज माध्यमांवर स्कॅनर पोस्ट केला आहे. आमदार शिंदेंच्या या कृतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली.

"भाजप (BJP) उमेदवार आमदार प्रा. राम शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहेत. यात त्यांची मालमत्ता 8 ते 10 कोटी रुपयांची जाहीर केली आहे. असे असताना त्यांचे हे आवाहन हास्यास्पद आहे", असा टोला रोहित पवार यांनी राम शिंदे यांना लगावला आहे. रोहित पवार यांच्या या टोल्यामुळे राम शिंदे अधिकच अडचणीत आले आहेत.

रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, "राम शिंदे लोकांना भावनिक साद घालत आहे. पण त्यांचा हा प्रयत्न फसला आहे. लोकं त्यांच्यावर हसत आहेत. त्यांनी आता नेत्यांना विकत घेणे, दारू वाटणे असे प्रकार सुरू केलेत". आणि त्यातल्या त्यात त्यांचे आवाहन हास्यस्पद आहे, असा टोला देखील रोहित पवार यांनी लगावला.

वचपा घेण्यासाठी शिंदेंची धडपड

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार आमदार प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार रोहित पवार यांच्यात थेट लढत आहे. इथल्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागलं आहे. 2019 मध्ये या दोघांमधील लढतीत, नवखे रोहित पवार यांनी मुरबी राम शिंदे यांच्यावर मात केली होती. त्याचाच वचपा घेण्यासाठी प्रा. शिंदे धडपडत आहेत. मतदारांपर्यंत पोचण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरत आहेत.

राऊतांच्या हेलिकॉप्टरला मुद्याहून परवानगी नाकारली

दरम्यान, रोहित पवार यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितमध्ये सभेचे आयोजन केले होते. परंतु हेलिकॉप्टरला परवानगी न मिळाल्याने ते सभेला येऊ शकले नाही. राऊत यांच्या हेलिकॉप्टरला मुद्दाहून परवानगी दिली नसल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. तर राम शिंदे यांनी संजय राऊतांना कळून चुकलं ;exoअसावं की, रोहित पवारांच्या सभेला जाण्यात काही अर्थ नाही म्हणून, असा टोला लगावला.

चांदीवाल अहवालावरून विरोधकांवर शिंदेंची टीका

निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अहवालावर भाष्य करताना आमदार प्रा. राम शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, "विरोधकांना देवेंद्र फडणवीस यांची भीती वाटत असावी. त्यावेळचे गृहमंत्री आणि सचिन वाझे यांनी देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आलं नाही". विरोधकांचे माप भरलं होते. म्हणून त्यांचे पक्ष फुटले. त्यामुळए नियती कुणालाही माफ करत नसत, असेही राम शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT