Jayant Patil- Narahari Jirwal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jayant Patil Politics : नरहरी झिरवाळांचा तो विषय जयंत पाटलांनी एका वाक्यातच संपवला !

Sampat Devgire

Jayant Patil News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या काही आमदारांच्या पक्षांतराच्या चर्चा आहेत.यामध्ये प्रामुख्याने नाशिकच्या आमदारांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर आहेत.त्यांच्या उपस्थितीत आज विधानसभा निवडणुकीची चर्चा होईल.यावेळी विविध मतदारसंघातील इच्छुकांची चर्चा होणार आहे.

या पार्श्वभूमीवर सकाळी आमदार पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळालेल्या प्रतिसादाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले.आगामी निवडणुकीत अजित पवार गटात गेलेले आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांना उमेदवारी देणार का? अशी विचारणा झाली.त्यावर आमदार पाटील यांनी त्याबाबत बोलणं योग्य होणार नाही.अशा एका वाक्यात त्यांचा विषय संपवला.

यावेळी ते म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणाऱ्या नाशिक जिल्हा आहे. त्यामुळेच या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विविध आमदार निवडून आले. मात्र या आमदारांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची फसवणूक केली. ज्या मतदारांनी या आमदारांना मते दिली, त्या मतदारांचीही फसवणूक केली आहे. मतदार त्याची प्रतिक्रिया आगामी निवडणुकीत व्यक्त करेल,असा माझा विश्वास आहे. ज्या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जास्त जागा लढविल्या आहेत. त्या जिल्ह्यांमध्ये सध्या आम्ही जात आहोत. तेथील राजकीय परिस्थितीचा आढावा घेत आहोत.

पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून चाचणी केली जात आहे. महाविकास आघाडी असल्याने अन्य पक्षांचे धोरण काय व त्या जागांवर त्या पक्षांची उमेदवारी किंवा जागावाटप याविषयीचा प्रश्न आत्ता चर्चा करणे योग्य नाही. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आणि चर्चा करून आगामी विधानसभा निवडणुकीचे धोरण ठरविले जाणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आत्मविश्वास आहे.त्यामुळे येत्या निवडणुकीत वेगळे चित्र दिसेल.असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT