Nashik Graduate Election News : नाशिक पदवीधर निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीत सत्यजीत तांबे यांना ३१ हजार ०९ मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांना १६ हजार ३१६ मते मिळाली आहेत.
दुसऱ्या फेरीअखेर सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांना १४ हजार ६९३ मतांची आघाडी मिळाली आहे. तसेच ५४४५ मते बाद झाले आहेत. नाशिक (nashik) पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. तर अद्यापही ही मतमोजणी सुरू असून थोड्या वेळात निकाल समोर येण्याची शक्यता आहे.
तसेच या निवडणुकीच्या मतमोजणीत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना पहिल्या फेरीत १५ हजार ७७४ मते मिळाली. तर पहिल्या फेरीत शुभांगी पाटील यांना ७५०८ मते मिळाली. त्यानंतर आता दुसऱ्या फेरी अखेर महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील पिछाडीवर आहेत.
दरम्यान, आता पहिली आणि दुसरी फेरी पूर्ण झाली असून तिसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू झाली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या फेरी अखेर सत्यजीत तांबे हे जवळपास १४ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
मात्र, अद्याप विजयाची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे थोड्याच वेळात ही घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कोण बाजी मारणार? हे थोड्या वेळात स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.