MLC Eletion Results : अद्यापही मतमोजणी सुरूच; काळे, तांबे, लिंगाडे आघाडीवर, पण..

Maharashtra MLC Eletion Results : औरंगाबाद, नाशिक, अमरावती या तीन जागांचा निकाल थोड्याच वेळात समोर येणार
Voting For Legislative Council Election
Voting For Legislative Council Election Sarkarnama
Published on
Updated on

Politics : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी अद्यापही सुरूच आहे. आत्तापर्यंत फक्त दोन जागांचा निकाल जाहीर झाला आहे.

यामध्ये कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवाराने बाजी मारली. तर नागपूरमध्ये महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) समर्थीत उमेदवार सुधाकर अडबाले हे निवडून आले आहेत.

मात्र, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ, नाशिक पदवीधर, अमरावती पदवीधर मतदार संघाची मतमोजणी अद्यापही सुरू आहे. या तीन जागांचा निकाल थोड्याच वेळात समोर येणार आहे. त्यामुळे आता येथे कोण बाजी मारतं? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Voting For Legislative Council Election
Kasaba By-Election : पक्षाने संधी दिली तर कसब्यातून निश्‍चितपणे निवडून येईन; धीरज घाटेंचा विश्‍वास

अमरावती : अमरावती पदवीधर मतदार संघामध्ये महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेले उमेदवार धीरज लिंगाडे हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. तर भाजपचे (BJP) डॉ. रणजित पाटील हे पिछाडीवर आहेत.

औरंगाबाद : औरंगाबाद शिक्षक मतदारसंघामधून राष्ट्रवादीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे (Vikram Kale) हे विजयाच्या जवळ आहेत. मात्र, अद्याही मतमोजणी सुरू आहे. त्यामुळे थोड्या वेळातच येथील निकाल समोर येण्याची शक्यता आहे.

Voting For Legislative Council Election
Nagpur : विमाशिचे सुधाकर अडबालेंच्या विजयात 'यांचा' आहे सिंहाचा वाटा...

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे सध्या आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) या पिछाडीवर आहेत. मात्र, येथील मतमोजणी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे थोड्या वेळात येथील चित्र स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com