Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीची येत्या दोन दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी महायुती सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊन सर्वच घटकांना खूश करण्याचा प्रयत्न करणारे निर्णय घेतले आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयांना केंद्रातील सरकारने देखील हातभार लावला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी कितपत हा प्रश्नच राहणार असून, त्यावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. संजय राऊत यांनी कमिशनचा आरोप केल्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मंत्रालय महाराष्ट्राचे भ्रष्टाचाराचे आगार झाले आहे. प्रचंड भ्रष्टाचार चालेला आहे. ज्यावेळी मंत्रिमंडळापुढे विषय येतो. जो मुख्यमंत्र्यानी सही केलेली असावी, तो वाचता की नाही, आला विषय की कर पास, असा कार्यक्रम चाललेला आहे. रोज शेकड्याने अध्यादेश काढले जातात. रद्दही होतात. चुकीचेही अध्यादेश काढले जात आहेत. रोज शेकडो अध्यादेश काढले जात आहेत. रोज रात्रंदिवस सर्वत्र छपाई सुरू असल्याचा घणाघात केला.
मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुकांच्या वाढलेल्या संख्येवर देखील थोरातांनी टोलेबाजी केली. ते म्हणाले, "प्रत्येकाची राजकीय इच्छाशक्ती व महत्वाकांक्षा असते हे, खरं आहे. महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री कोण? याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. भावी मुख्यमंत्र्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे महायुतीने आमची चिंता करण्यापेक्षा त्यांचा भावी विरोधी पक्षनेता कोण? याची चिंता करावी".
आमदार थोरात यांनी नुसते अध्यादेश काढले की काम झाले असे होत नाही. त्या अध्यादेशाची प्रत्यक्षात किती अंमलबजावणी होते, जनतेला त्यातून किती विकासात्मक फायदा झाला, हे देखील पाहिले पाहिजे. राज्यामध्ये माणसं उपाशी आहेत, रस्ते धड नाही, शेतकऱ्यांच्या (Farmer) शेतीमालाला भाव नाही, पुरेशी वीज नाही, चांगले शिक्षण मिळत नाही, शाळांना शिक्षक नाहीत, एसटी खिळखिळी झाली आहे, त्या बदलल्या पाहिजे, असे असताना जाहिरातींवर हजारो कोटी रुपये खर्च केला जात आहे. यांचा विकास फक्त कागदावरच दिसतो, असा टोला थोरातांनी लगावला.
'चार दिवसांवर आचारसंहिता आली, तरीही सोशल मीडियासाठी हजारो कोटी रुपयांचे टेंडर काढले जात आहे. राज्याची तिजोरी खिळखिळी केली जात असून तिची सर्रासपणे लूट सुरू आहे. त्यामुळे जनता सरकारला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी महायुतीला बोजड झाली आहे. अजित पवार खटपटीचे राजकरण करतात. भविष्यात बघू काय काय होते', असेही थोरात यांनी म्हंटले.
'लाडकी बहीण योजना बंद करण्याबाबत आम्ही काही म्हटलेले नाही, आम्ही याच्यापेक्षा चांगली वेगळ्या स्वरूपात ही योजना आणू. सर्वसामान्याचे हित, सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणे हे महाविकास आघाडीचे सूत्र राहिलेले आहे. हप्ते घेणारे कोण हे सर्वांना कळते आहे. हे खोके कुठून आले. या हप्त्यांमधून खोके तयार होतात. यांचे दिल्लीपासून हे 50 खोके कुठून आले, कसे तयार झाले, माहिती नाही', असाही टोला थोरातांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.