Raj Thakre Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

`एसटी`चे व्यावस्थापन खाजगी तज्ञांच्या हातात देणे आवश्यक!

राज ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यात मनसे-भाजप युतीचे संकेत दिले

Sampat Devgire

नाशिक : शरद पवार (Sharad Pawar) यांना वाढदिवसासाठी मी फोनवरून शुभेच्छा दिल्या. या वयात ते जे काम करतायेत ते विलक्षण आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून चांगल्या गोष्टींना चांगले म्हणणं आवश्यक असते. त्यामुळे शरद पवारांच्या काम देखील त्या श्रेणीत मोडते, असे मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thakre) यांनी सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे आज शहरात आगमन झाले. यावेळी त्यांचे पक्षाच्या कार्यालयात मोठ्या संख्येने जमलेले कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी उत्साहात स्वागत केले. आगामी महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांतील उत्साह चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

एस. टी. कर्मचारी संपाबाबत ते म्हणाले, राज्य सरकारने हा विषय गांभिर्याने घेतलेला नाही. त्यांनी विचार करावा की, एक लाख कर्मचारी अंगावर आले तर काय करणार?. हे कर्मचारी एस. टी. कर्मचारी युनियन बाजूला सारून संप करताहेत. लोकांनी राज्य तुम्हाला हातात दिले आहे. त्यामुळे मुख्य।मंत्र्यानी याबाबत बोलणे आवश्यक आहे. मात्र ते तसे करताना दिसत नाही. गेले चार महिने या कर्माचाऱ्यांचा पगार नाही. चार महिने भ्रष्टाचाराच्या कारभारातील पैसे आले नाही की यांचा जीव कासावीस होतो. मग कर्मचाऱ्यांच्या पगाराचा देखील विचार करायला हवा, अशी कोपरखळी त्यांनी मारली.

आगामी महापालिका निवडणुकांबाबत भाजपशी मनसेची युती होणार काय याविषयी उत्सुकता आहे. याविषयी विचारले असता, यासंदर्भात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात याविषयावर चर्चा झाली आहे.

ते पुढे म्हणाले, ग्रामीण भागाला जोडणारी महत्वाची सेवा आहे. जोपर्यंत एस. टी. मधील भ्रष्टाचार थांबत नाही तोपर्यंत त्या महामंडळाची उन्नती शक्य नाही. एसटी खाजगी व्यवस्थपनाच्या हातात देणे आवश्यक आहे. हा संप गांभिर्याने घ्यावा, कारण एक लाख कर्मचारी अंगावर आले तर काय करणार?.

यावेळी मनसेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप दातीर, नगरसेवक सलीम शेख आदी उपस्थित होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT