नाशिकला राज ठाकरेंचे झाले उत्साहात स्वागत!

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा दौरा सुरु.
Raj Thakre
Raj ThakreSarkarnama

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thakre) आज शहरात दाखल झाले. यावेळी त्यांचे पक्षाच्या कार्यालयात मोठ्या संख्येने जमलेले कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी उत्साहात स्वागत केले. आगामी महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांतील उत्साह चर्चेचा विषय ठरला.

Raj Thakre
देशाचे राजकारण करायचे अन् गावातला सरपंच ऐकत नाही!

राज ठाकरे यांचे नुकतेच शहरात आगमण झाले. नाशिक व औरंगाबाद शहरांच्या दौऱ्यावर निघालेल्या ठाकरे यांचे शहरातील राजगड या पक्षाच्या कार्यालयात आगमण झाले तेव्हा मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांसह मुंबईतील काही पदाधिकारी त्यांच्या समवेत आहेत.

Raj Thakre
आमदार सीमा हिरे, हिरामण खोसकरांच्या पत्राचा गैरवापर खरा की खोटा?

श्री. ठाकरे यांचे आगमण झाल्यावर जिल्हा अध्यक्ष दिलीप दातीर यांसह प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या. आजच्या त्यांच्या दौऱ्यात अन्य पक्षातील काही पदाधिकारी मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत.

सद्यस्थितीत शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांनी स्बळावर निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची युती होण्याची चिन्हे आहेत. अशा स्थितीत राज्यस्तरीय राजकारणाचा भाग म्हणून महाविकास आघाडीचा राजकीय पॅटर्न अस्तित्वात आल्यास मनसेने स्वबळाऐवजी भाजपशी युती करावी असा एक मतप्रवाह आहे. त्यादृष्टीने श्री. ठाकरे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. श्री. ठाकरे यांचे आगमण होताच त्यांनी बंद दाराआड पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरु केली. ही बैठक अद्याप सुरु आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com