नेत्यांनी शरद पवारांच्या अनेक गुणांपैकी एकतरी घ्यावाच!

कादवा कारखान्यांवर व्हर्च्युअल रॅलीत नरहरी झिरवाळ सहभागी झाले.
Narhari Zirwal
Narhari ZirwalSarkarnama

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अनेक गुणांपैकी किमान एक जरी गुण घेतला तरी आपण यशस्वी झालो असे समजावे असे गौरवोद्गार विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी काढले. कादवा सहकारी साखर कारखाना येथे शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या व्हर्च्युअल रॅलीच्या थेट प्रक्षेपणाप्रसंगी ते बोलत होते.

Narhari Zirwal
देशाचे राजकारण करायचे अन् गावातला सरपंच ऐकत नाही!

श्री. झिरवाळ म्हणाले, कि शरद पवार नेहमीच कार्यकर्ता हेरताना कधीही त्याची परिस्थितीपाहत नसत. त्याची गुणवत्ता तपासून त्याला जबाबदारी देतात, याचे उदाहरण म्हणून मी स्वतः असून पवारसाहेब ज्या विश्वासाने आपल्या तालुक्यावर जबाबदारी दिली आहे, तोच विश्वास आपल्याला यापुढे सार्थ ठरवून दिंडोरी तालुक्याचे नंदनवन करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावयाचे आहेत. वयाच्या ८१ व्या वर्षीही त्यांच्यात असलेली उमेद व सचोटी तरुण कार्यकर्त्यांना व ज्येष्ठ लोकांनाही उभारी देणारे आहे.

Narhari Zirwal
ओबीसी समाजास हक्कापासून वंचित ठेवून चालणार नाही

कादवा साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे म्हणाले, ज्या वेळी देशावर व राज्यावर संकटे आली असतील, अशा वेळी शरद पवार हे स्वतः सर्वांचे पुढे उभे राहून मार्गदर्शकाची भूमिका बजावून त्यातून मार्ग काढत कायमस्वरूपी उपाययोजना केल्या आहेत. साखर उद्योगाच्या बाबतीत ते हा उद्योग जिवंत ठेवण्यासाठी सतत चिंतनशील असतात, त्यासाठी त्यांनी मोठा हातभार लावला आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com