Ahmednagar News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar ATS News: 'एटीएस'ची नगरमध्ये मोठी कारवाई; बनावट पासपोर्ट व आधार कार्डसह बांगलादेशी घुसखोरांना अटक

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar : एजंटामार्फत बनावट पासपोर्ट आणि आधारकार्ड बनवून नगर शहरात एका स्टोन क्रशरवर आपली मूळ ओळख लपून काम करणारे चार बांगलादेशी घुसखोरांना नाशिकच्या दहशतवादी पथकाने नगर पोलिसांच्या मदतीने पकडले आहे. या घुसखोरांना मदत करणारे अशा एकूण दहा जणांविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर(Ahmednagar) मध्ये दहशतवाद विरोधी पथकाची या कारवाईने खळबळ उडाली असून या पद्धतीने जिल्ह्यात घुसखोरी होत असेल तर ही मोठी चिंतेची बाब असल्याचे बोलले जात आहे. पकडलेल्या घुसखोरांजवळ बनावट पासपोर्ट व आधार कार्ड आढळून आले आहेत. या घुसखोरीस मदत करणाऱ्या एजंटाचा शोध आता सुरू करण्यात आला आहे.

भारतात घुसखोरी करून थेट नगरमध्ये आलेल्या हे चार बांगलादेशी(Bangladesh) घुसखोर नगर-दौंड रोडवर खंडाळा गावच्या शिवारात असलेल्या एका स्टोन क्रेशरवर काम करत होते. त्यांच्याकडे बनावट पासपोर्ट, बनावट आधार कार्ड आणि त्या आधारे घेतलेले मोबाईल सीम कार्ड आढळून आले आहेत.

मोहीउद्दीन शेख, शहाबुद्दीन जहाँगीर खान, दिलावर सिराजउल्ला खान, शहापरान जहाँगीर खान अशी पकडण्यात आलेल्या घुसखोरांची नावे आहेत. नगर तालुक्यातील खंडाळा येथील शिवशक्ती स्टोन क्रेशर येथे हे चौघेजण काम करत होते. स्टोन क्रशर नजीकच असलेल्या पत्र्याच्या खोल्यांमध्ये त्यांचे वास्तव्य होते. दहशतवाद विरोधी पथका(ATS)च्या नाशिक येथील युनिटला बुधवारी याबाबतची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

बांगलादेशमधून बेरोजगारीला कंटाळून भारतात छुप्या पध्दतीने पकडण्यात आलेले घुसखोर आले होते. चोरट्या मार्गाने पायी चालत पश्चिम बंगाल येथे आल्यानंतर तेथून रेल्वेने कल्याण येथे गेले. कल्याणमध्ये काही दिवस काम केल्यावर ते नगरमध्ये आले होते, अशी माहिती त्यांनी दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली आहे.

दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप गिरी, पोलिस अंमलदार वडकते, तांबोळी, मोरे, प्रदीप गागरे यांनी तातडीने नगरमध्ये येऊन नगरच्या दहशतवाद विरोधी पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाकीर शेख, राकेश खेडकर, पोलीस अंमलदार गोरे, संजय हराळे यांनाबरोबर घेऊन ही कारवाई केली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT